shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पतंजलि योग समिती इंदापूर यांचेवतीने*हर घर तिरंगा अभियान*

पतंजलि योग समिती  इंदापूर यांचेवतीने
*हर घर तिरंगा अभियान*

इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर नगरपालिकेजवळील शाळा नं. १ व २ येथे सुरु असलेल्या स्थाई योगवर्गामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त   आजपासुन सुरु होणार्‍या हर घर तिरंगा या देशभक्तिपर अभियानाची ध्वजसंहिता सांगुन तिरंगा फडकवण्यात आला..
यावेळी नगरपालिकेसमोरील क्रांतिकारकांच्या स्मृतिस्तंभास अभिवादन करुन देशभक्तिपर घोषणा देण्यात आल्या.

तिन दिवस चालणार्‍या या अभियानामध्ये सर्व नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी सामाजीक कार्यकर्ते हमीदभाई आतार ,सायराभाभी आतार,चंद्रकांत देवकर युवा भारतचे प्रशांत गिड्डे ,सचिन पवार,रविंद्र परबत,रामेश्वर साठे,बिभिषण खबाले, आण्णा चोपडे ,ज्ञानेश्वरडोंगरे,गोकुळ हराळे,समाधान भोरकडे यांचेसह योग समितीच्या सर्व महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते
       *युवा  भारतच्या वतीने समाजातिल वंचित घटक ज्यांना अजुनही अभियान हे माहित नाही अशा विटभट्टी मजुरांच्या घरी जावुन राष्ट्रध्वजाचे मोफत वाटप  करण्यात आले आणि घरघर तिरंगा विषयी माहीती सांगण्यात आली.*
close