श्रीरामपूर (शौकतभाई शेख) : तालुक्यातील बेलापूर येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटी संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय बेलापूर येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना ,विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उपस्थित विद्यार्थ्यांना हरघर तिरंगा निमित्त १५० तिरंगा ध्वज वाटप करुन भव्य रॅली काढण्यात आली.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र व राज्य सरकारच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
शासन निर्णयानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती कोरल्या जावून स्वतंत्र संग्रामातील ज्ञात अज्ञात क्रांतिवीर यांच्या आठवणी,देशभक्तीची भावना जन माणसाच्या हृदयात कायम तेवत राहावी या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे यांनी सांगितले.
यावेळी ध्वजसंहितेबाबत विद्यार्थ्यांना प्रा.अशोक थोरात यांनी मार्गदर्शन केले..उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रप्रेम, देशप्रेम, राष्ट्रभक्ती याबाबत मनामध्ये अभिमान जागृत होवून देश निष्ठा निर्माण होईल यातून राष्ट्रविकास घडून येईल असे मत बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव अॅड.शरद सोमाणी यांनी व्यक्त केले.उपाध्यक्ष अशोकनाना साळुंके व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.चंद्रकांत कोतकर,प्रा.रुपाली उंडे ,विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.डॉ. संजय नवाळे ,अंतर्गत गुणवत्ता समितीचे समन्वयक डॉ. बी. एन.पवार, पर्यावरण प्रमुख प्रा.अशोक थोरात यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय ग्रंथशास्राचे जनक एस.एन.रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पुजन करुन सी.डी.जैन महाविद्यालय श्रीरामपूर येथिल ग्रंथपाल डॉ. मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली.सचिव ॲड. सोमाणी यांनी श्रीफळ फोडून रॅलीचे उद्घाटन केले. मान्यवरांच्या शुभहस्ते तिरंगा झेंड्यांचे वाटप करण्यात आले.रॅली संयोजनासाठी क्रिडा विभाग संचालक प्रा.विनायक काळे , ग्रंथालय प्रमुख प्रा.सतिश पावसे, प्रा.सुनिल विधाटे, विद्यार्थी प्रतिनिधी प्रफुल्ल खपके व सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक,प्राध्यापकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. रॅलीमधे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.भारतमातेच्या घोषणांनी सर्व बेलापूर परीसर दुमदुमून गेला होता.

