रविवारी १४ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर तालुका यांच्यावतीने इंदापूर मध्ये सायं. ७ वाजता भव्य मशाल मिरवणूक.
इंदापूर प्रतिनिधी: स्वातंत्र्योत्तर भारताच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर तालुका यांच्यावतीने दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता मशाल मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले असून ही मिरवणूक नगरपालिका मैदान ते हायवे, बाबा चौक, व्यंकटेश नगर, खडकपुरा, नेहरू चौक, आंबेडकर नगर ,श्रीराम चौक, संभाजी चौक, नेहरू चौक, बागवान गल्ली, तेली गल्ली, बटर गल्ली, शेख मोहल्ला, खडकपुरा ,नगरपालिका मैदान असा मशाल मिरवणूक मार्ग आहे. हर घर तिरंगा राष्ट्रीय अभियान अंतर्गत मशाल मिरवणुकीत आपण बघून संख्येने उपस्थित राहून राष्ट्रभक्ती जागृत करावी असे आवाहन इंदापूर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

