महादेवनगर (शहा) येथील जय भवानी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील महादेवनगर (शहा) येथील जय भवानी नवरात्र उत्सव मंडळाने नवरात्र उत्सवानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
नवरात्र उत्सवा निमित्ताने मंगळवारी (दि.२७) रोजी रात्री सुप्रसिद्ध प्रवचन व कीर्तनकार सागर बोराटे यांच्या कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे, त्याचबरोबरबुधवार दिनांक २८रोजी लिंबू चमचा स्पर्धा,गुरुवार २९ रोजी भव्य डान्स स्पर्धा,शुक्रवार ३० रोजी महिला साठी भव्य संगीत खुर्ची स्पर्धा,१ ऑक्टोबर रोजी भव्य ग्रुप डान्स स्पर्धा तसेच रविवार २ ऑक्टोबर रोजी तुळजाभवानी आराधी मंडळ महादेवनगर तुळजाभवानी आराधी मंडळ बार्शी यांच्या सुमधुर आवाजात गाण्यांची जुगलबंदी, तसेच सोमवार ३ऑक्टोबर रोजी भव्य होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक व इंदापूर पंचायत समितीचे सदस्य सतीश पांढरे यांनी दिली.
या स्पर्धेसाठी संतोष पांढरे, अंबादास कुंभार, शिवाजी पांढरे, इंद्रजीत मदने, तुकाराम कडवळे,हर्षवर्धन जाधव, मयूर कडवळे, योगेश बनसोडे, शहाजी तोबरे, सोमलिंग निकम, संभाजी निकम,दिलीप कडवळे ,पांडुरंग कुभार,प्रकाश निकम,ज्ञानेश्वर कुंभार, सुनील निकम, बाळासाहेब वाघमोडे,संतोष शिंदे, यांनी बक्षिसांचे आयोजन केले आहे,तर गावातील युवक हनुमंत निकम, संजय कुंभार, भिवा निकम, उमेश कडवळे, अनिल पांढरे, शहाजी पांढरे,अर्जुन निकम,अशोक पांढरे,अरुण जाधव ,बबन जाधव,वसंत कडवळे या सहकाऱ्यांनी स्टेज व इतर साहित्याचे सहकार्य केले आहे.
तसेच कै भीमराव(नाना) पांढरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र संतोष पांढरे यांच्यामार्फत टी-शर्ट चे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना जय भवानी नवरात्र उत्सव मंडळाचे प्रमुख व इंदापूर पंचायत समितीचे सदस्य सतीश पांढरे म्हणाले की सालाबाद प्रमाणे नवरात्री निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, परिसरातील युवक युवती, महिला, विद्यार्थी यांनी भाग घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

