प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : २३ /   महाराष्ट्र रोल बॉल संघटनेच्या वतीने १६ वी राज्यस्तर जूनियर (१७ वर्ष मुले व मुली) रोल बॉल स्पर्धा २०२२ धुळे येथे आयोजित करण्यात आली आहे . सदर स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्हा रोल बॉल संघटनेच्या वतीने रविवार दि . २५ नोव्हेंबर रोजी हार्मोनि इंटरनॅशनल स्कूल,  वडगाव गुप्ता, नगर येथे सकाळी ८ वाजता पासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा संघटना सचिव श्री. प्रदीप पाटोळे यांनी दिली .

 सदर स्पर्धा या १७ वर्ष मुले व मुलींसाठी असून खेळाडूचा जन्म दिनांक ०१/ ०१ /२००६ व त्या नंतरचा असावा. जिल्हास्तर स्पर्धा मधून उत्कृष्ट संघ निवडून सदर संघ धुळे येथे होणा-या राज्य स्पर्धा साठी अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे, विजात्या संघास प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे संघ चषक, खेळाडू पदक व प्रमाण पत्र असे परितोषिक देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती संघटना प्रशिक्षक श्री. आनंद पटेकर यांनी दिली.

कोविड प्रादुर्भाव संपल्या नंतर आता खेळाडूंना आपले कसब दाखविण्याचे व अहमदनगर जिल्ह्याचे नावलौकिक मिळविण्यास ही एक उत्तम संधी असून या संधीचा लाभ अहमदनगर मधील जास्तीत जास्त खेळाडूंनी घ्यावा असे आवाहन जिल्हा संघटना अध्यक्षा सविता मकासरे यांनी केले. स्पर्धेच्या अधिक माहिती करीता सचिव श्री. प्रदीप पाटोळे ८२७५१९१७७१ किवा श्री. आनंद पटेकर ९८९०७४४४९० यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे .