अहमदनगर । प्रतिनिधी :
प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते, अखील महाराष्ट्र वडार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष
रमेश शिंदे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने आज (शुक्रवारी) त्यांचे निधन झाले.
त्यांचे पश्चात एक मुलगा, मुलगी, तीन भाऊ, पुतणे,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
शिंदे यांनी अखील महाराष्ट्र वडार समाज संघटनेचे
जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले. वडार समाजाच्या भेडसावत असलेल्या प्रश्नांना सोडविण्यासाठी जिल्हात आवाज उठवला तसेच वडार समाज जागृती अभियान राबवून त्यांनी २००० ते २०१० पर्यंत महाराष्ट्र भर दोरे व मेळावे, उपोषण, आंदोलने आयोजित केले होते.
ते बांधकाम व सिंचन क्षेत्रातील फार मोठे उद्योजक असून देखील त्यांनी कधी ही मोठेपणा, अहंभाव कधीच दाखवला नाही.नेहमी हसतमुख व सहकार्याची भूमिका ठेवून गरिबांच्या सान्निध्यात राहून काम करत राहिले , तसेच त्यांनी गोर-गरिबांची जीवन भर सेवा केली.
प्रसिद्ध उद्योजक सिताराम शेठ शिंदे व सतिशशेठ शिंदे यांचे मोठे बंधू होत, तसेच अहमदनगर महानगरपालिकेचे भाजपाचे नगरसेवक
देवाज ग्रुपचे अध्यक्ष स्वप्निल शिंदे यांचे काका होत.
शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह परिवाराच्या वतीने आदरणीय रमेश शेठ शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐💐💐

