शिर्डी । प्रतिनिधी (संजय महाजन):
शिर्डी खूप दिवसापासून प्रलंबित असलेल्या साईश कॉर्नर ते गणेश गॅस एजन्सी पर्यंत रस्ता रुंदीकरण करावे अशी मागणी माजी नगरसेवक अशोक गायके यांनी केले आहे. शिर्डीतील सर्व उपनगरातील रस्त्याची रुंदीकरण झाले आहे तात्कालीन मुख्याधिकारी दिघे साहेब यांनी हा रस्ता मोजणी करून त्याची निशाणही केले आहे.
ह्या रस्त्याला नगर जिल्ह्यातील सर्वात मोठी जिल्हा परिषद शाळा असल्याने लहान मुले जीव धोक्यात घालून प्रवास करतात तसेच या रोडला हॉटेल लाईन सत्त म दत्तनगर माऊली नगर गायके वस्ती साई पंढरी नगर शेळके व शिंदे वस्ती असे मोठे उपनगर असल्याने या ठिकाणी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो याबाबत सध्याचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे शिर्डी नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांच्याकडे साधारण दीड वर्षापासून नागरिकांच्या समस्या मांडून तक्रार करीत आहोत.
याबाबत राहत्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय दादा विखे पाटील या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत त्यांच्याकडे तक्रार करणार आहोत तसेच या रोडने मोठे डंपर वीट भट्टीचे ट्रॅक्टर व लहान मोठे वाहने असल्याने अपघात मोठ्या प्रमाणाने होतात असे माजी नगरसेवक अशोक गायके यांनी सांगितले.

