shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारत जोडो यात्रेत मराठवाड्यातून एकमेव राष्ट्रीय भारत यात्री..! डॉ.श्रावण रॅपनवाड देशव्यापी यात्रेत सहभागी..!!

 शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
नांदेड । दि.17 :

    काँग्रेस नेते खा.राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी ते कश्मीर निघालेल्या बहुचर्चित "भारत जोडो यात्रा' मध्ये देशभरातील ११८ राष्ट्रीय 'भारत यात्री'त संपूर्ण मराठवाड्यातून नांदेड जिल्ह्यातील मुखेड चे एकमेव डॉ.श्रावण गोविंदराव रॅपनवाड यांना संधी मिळाली आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 



यात्रेत सहभागी डाॅ.श्रावण रॅपनवाड


     
 येथून सुरू झालेल्या "भारत जोडो यात्रा' मध्ये खा.राहुल गांधी यांच्यासोबत चालणारे देशभरातून ११८ पदाधिकारी कॅटेगिरी १ कायम राष्ट्रीय 'भारत यात्री' म्हणून निवडण्यात आले आहेत. त्यासाठी ऑगस्ट मध्ये दिल्ली येथील राष्ट्रीय कार्यालयात सर्व राज्यांतील हजारो पदाधिकाऱ्यांना बैठकीला बोलावून २ वेळा मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यातून मराठवाड्यातून एकमेव मुखेड चे भूमिपुत्र तथा महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव डॉ.श्रावण रॅपनवाड यांच्यासह महाराष्ट्रातून नऊ तर पूर्ण देशातून एकूण ११८ जणांची निवड करण्यात आली. यासाठी त्यांची, पक्षकार्य, सामाजिक कार्य, स्वतःचा उत्साह, स्वसंकल्पना, विद्यमान राजकीय परिस्थिती वर उपाय ज्ञान आणि कौटुंबिक स्थिती हे तपासले गेले. डॉ.श्रावण रॅपनवाड यांची निवड होताच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, काँग्रेस ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष प्रा.भानुदास माळी, विधानपरिषद काँग्रेस गटनेता आ.अमर राजूरकर, माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आ.अविनाश घाटे आदींसह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 

       भारत जोडो यात्रेत संपूर्ण मराठवाड्यातून एकमेव संधी मिळालेले डॉ.श्रावण रॅपनवाड हे पक्षादेशाप्रमाणे ५ सप्टेंबरलाच कन्याकुमारी ला दाखल होऊन पहिल्या दिवसापासून अर्थात ७ सप्टेंबर पासून यात्रेत सक्रिय सहभागी आहेत. भारत जोडो यात्रेत डॉ.रॅपनवाड यांनी या आठवडाभरात मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री खा.दिग्विजय सिंह, माजी मंत्री जयराम रमेश, काँग्रेस चे राष्ट्रीय महासचिव मा.के.सी. वेणुगोपाल,मा मंत्री शशी थरूर, ज्येष्ठ सामाजिक नेते योगेंद्र यादव, निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांच्याशी जवळीक साधून महाराष्ट्रातील सद्यस्थित सामाजिक,राजकीय आणि पक्षांतर्गत बाबींवर चर्चा केल्याचे सांगितले.प्रत्येक कार्यक्रम, उपक्रमात पुढाकार घेत, यात्रेदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या लोकांशी संवाद साधत ते मार्गक्रमण करीत असून विश्रांतीसमयी महाराष्ट्रभरातून येणाऱ्या कॉल्स ना उत्तर देत आहेत. सदर यात्रेला मिळणारा लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, घरच्यांचं प्रोत्साहन आणि प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री तसेच सर्व मान्यवर नेत्यांचे फोनवर नियमित विचारपूस यामुळे रोज २५ कि.मी. चालल्याचा थकवा अजिबात राहत नाही असे डॉ.श्रावण रॅपनवाड यांनी शिर्डी एक्सप्रेसच्या प्रतिनिधीला भ्रमणध्वनीवरून सांगितले.
close