एक मुलगी शिकली तर संपुर्ण कुटुंब शिकल्यासारखे ; सौ.ज्योती गडकरी

 शौकतभाई शेख श्रीरामपूर :  -
 पूर्वीच्या काळापासूनच शिक्षणाला महत्त्व आहे. पण पुरातन काळ म्हणा किंवा स्वतंत्र पूर्वीचा काळ बघितला तर निदर्शनास येते की, महिलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण फार कमी होते. पुरुषप्रधान राहिलेले या जगात महिलांच्या बाबतीत धोरण ठरविण्यात न्याय नाही झाला. पण थोर समाजसेवकांनी केलेल्या प्रबोधनामुळे आज महिला शिक्षणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कुटुंबात जर एखादा मुलगा शिकला तर तो फक्त एकटाच शकतो, पण जर एक मुलगी शिकली तर संपूर्ण कुटूंबास शिक्षित करते, असे प्रतिपादन तोफखाना पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक सौ.ज्योती गडकरी यांनी केले.

     अहमदनगर येथे नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट च्यावतीने शिक्षक दिनानिमित्त संस्थेच्या अहमदनगर उर्दू प्रायमरी स्कूल, अहमदनगर उर्दू हायस्कूल ,मिसगर जूनियर कॉलेज आर्ट्स अँड सायन्स, एम इंग्लिश मीडियम स्कूल मधील सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. तसेच सय्यद आसिफ सर यांची मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला.
 याप्रसंगी तोफखाना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक सौ.ज्योती गडकरी, मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव शेख मन्सुर अजीज, नगरसेवक आसिफ सुलतान, माजी विश्वस्त रशीद सर, हॉकर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय झिंजे, माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, संध्याताई मेढे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रवीणताई घैसास, आरपीआय महिला जिल्हाध्यक्ष जयाताई गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते मुजाहिदभाई कुरैशी, विश्वस्त मंडळाचे फरहान खान, नवीद तांबटकर, पत्रकार हाजी सय्यद वहाब आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. तर अहमदनगर उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सय्यद आसिफ सर यांना सन्मानित करण्यात आले. तसेच संस्थेच्या हायस्कूल व कॉलेजमधील दहावी व बारावी मधील पहिल्या तीन आलेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
        यावेळी नागरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, संस्थेच्या माजी विश्वस्तांनी फार कष्टानी या संस्थेला उभे केलेले आहे. त्याची जाणीव ठेवुनच आम्ही संस्था पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यात आम्हाला भरपूर यश आले आहे. आम्ही  मिसगर जमातच्या लोकांसाठी संस्थेतर्फे विविध उपक्रमांना भरपूर मदत वाढवली आहे. त्याचा सर्व समाजाला भरपूर फायदा मिळत आहे. तसेच समाजातील गरजूंना आणि शिक्षणासाठी ही भरघोस मदत करत आहोत. पूर्वीचे शिक्षण व आजच्या शिक्षणामध्ये मोठे बदल झालेले असून आजचे आधुनिक शिक्षण चांगल्या शिक्षकांच्या वतीने विद्यार्थ्यांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्यामुळे भविष्यात एक चांगली सुशिक्षित व संस्कारित पीढी निर्माण होऊ शकते.व संस्थेचे  नाव समाजामध्ये मोठे करण्याचा आमचा मानस असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले. तर प्रास्ताविक मुन्नवर हुसेन यांनी केले. आभार संस्थेचे सचिव इमरान शेख यांनी मानतांना आवाहन केले की प्रत्येकाने जीवनात एक तरी गरजू विद्यार्थी शिक्षणासाठी दत्तक घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

अहमदनगर - नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टच्या संस्थेतील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना पो.नि.ज्योती गडकरी. समवेत शेख मन्सुर अजीज, नगरसेवक आसिफ सुलतान, रशीद सर, संजय झिंजे, रफिक मुन्शी, साहेबान जहागीरदार, संध्याताई मेढे, अशोक गायकवाड, प्रवीणताई घैसास, जयाताई गायकवाड, मुजाहिदभाई कुरैशी, विश्वस्त युनूसभाई तांबटकर, इम्रान शेख, फरहान खान, नवीद तांबटकर, इम्रान खान, हाजी सय्यद वहाब आदी. (छाया : श्रीकांत वंगारी)