शौकतभाई शेख श्रीरामपूर :
येथील क.जे.सोमैया कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकदिन मोठ्या उत्साहात उत्साहात साजरा करण्यात आला, दि. ५ सप्टेंबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जयंती निमित्त हा दिवस शिक्षकदिन म्हणून साजरा करण्यात येतो, यावेळी देखील डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,
याप्रसंगी महाविद्यालयाचे चेअरमन विजय नगरकर यांनी गुणवंत विद्यार्थ्याचे कौतुक करत शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या, कार्यकारणी सदस्य माणिक जाधव यांनी विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या, त्याजबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य विठ्ठल भांगरे (सर) यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले व महाविद्यालय विभाग प्रमुख प्रा.श्री योगेश शेटे आणि प्रा.अविनाश राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले,
विद्यार्थी परिक्षण प्रा.चंद्रकला जाधव, प्रा . दिपाली जाधव आणि प्रा.सुवर्णा कुमावत यांनी केले.या कार्यक्रमात विद्यार्थांनी शिक्षक बनुन सहभाग घेतला, प्राचार्यांची भुमिका चि. आयान पठाण तर शिक्षकांची भुमिका कु.विधावे निकिता, कु.पिंजारी आरजू , कु .सोनवणे शिवानी ,चि.तूवर दीपक,चि.चुनोरिया अजय, चि. शिंदे विनायक, चि.काळे अभिषेक चि. टपाल प्रशांत, चि. राजेश शिरसाठ,चि.सोनवणे रोहित तसेच शिपाई माळी मामाची भुमिका चि.बागवान जैनुल यांनी केली,अशा प्रकारे महाविद्यालयात संपूर्ण कार्यक्रम हसत खेळत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

