श्रीरामपूर (प्रतिनिधी) :- तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्री.प्रशांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप किपर फेडरेशन (स्वस्त धान्य दुकानदार संघटना) शाखा श्रीरामपूर तालुका संघटनेच्यावतीने श्री साई विठ्ठल अनाथ आश्रम येथील मुलांना शालेय साहित्य,दफ्तर, पाणी बाॅटल व खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णाणानंद महाराज, सचिव ज्ञानेश्वर महाराज आढाव, उपाध्यक्ष प्रकाश मेहेत्रे यांनी सत्कार करून सर्व दुकानदार व पदाधिकारी यांचे आभार मानले. यावेळी तालुकाध्यक्ष माणिकराव जाधव, नरेंद्र खरात,सोमनाथ देवकर, शिवाजी सैद, विनायक उबाळे, राहुल म्हस्के, राहुल पगारे, मुरलीधर वधवानी, संतोष वेताळ, सामाजिक कार्यकर्ते विजयराव नगरकर तथा इतरही सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

