shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

घटस्थापना पुजा विधी..!

शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क

सर्व मंगल मांगल्ये,
शिवा सर्वार्थ साधिके |
शरण्ये त्र्यंबके गौरी,
नारायणि नमोस्तुते ||


आपणास आणि आपल्या परिवारास नवरात्रीच्या व घटस्थापनेच्या शुभेच्छा....!

🙏🌹 घटस्थापना🌹🙏

आज सोमवार दि.२६/०९/२०२२ घटस्थापना केली जाईल. शुभमुहूर्त सकाळी ६.२८ ते सायंकाळी ८.०० आहे.सोमवार पासून शारदीय नवरात्रौत्सवाचा प्रारंभ होतो.

🔸घटस्थापना पूजा विधी

घटस्थापना करताना घट पाटावर किंवा चौरंगावर मांडला जातो त्यामुळे चौरंग किंवा पाटाखाली रांगोळी काढावी व त्यावर हळदीकुंकू घालावे.
    चौरंगावर अथवा पाटावर लाल वस्त्र अंथरावे. पानाची पत्रावळ घेऊन त्यामध्ये माती घालावी व त्यामध्ये मिश्र धान्य पेरावे व मधोमध कलश ठेवावा. कलश तयार करताना त्यात हळदकुंकू, सुपारी,अक्षता,दूर्वा,अकरा रुपयांची नाणी टाकावीत.
    कलशास हळदीकुंकवाचे पट्टे ओढावेत अथवा स्वस्तिक काढावे कलशामध्ये नागवेलीची (खाऊची पाने)घालावीत व त्यामध्ये श्रीफळ (नारळ )ठेवावा. कलशाला हळदी-कुंकू,गंध,अक्षता,फुले वाहून पूजा करावी.
    कलशास वेणी,चुनरी अथवा गजरा घालावा. धूप, दीप, नैवेद्य दाखवून करावा.नवरात्रामध्ये प्रत्येक दिवशी फुलांची माळ वाढवत जावी.
   सकाळ संध्याकाळ पूजा आरती करावी व जगदंबेची मनोभावे प्रार्थना करावी,
     "आई अंबाबाई... आम्हां सर्वांचं कल्याण कर... रक्षण कर....व सर्वांनाच सुखी ठेव..."🌹🙏

🙏🚩🛕ॐ卐ॐ🛕🚩🙏
close