*भिमाई आश्रमशाळेत गोकुळदासशेठ (भाई) शहांना वाहिली आदरांजली* !
*इंदापूर इंदापूर (दि.१०) :- येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात सर्व विभागाच्या विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रशाळेच्या प्रांगणात २ मिनिट स्तब्ध उभे राहून गोकुळदासशेठ ( भाई) शहांना शनिवारी (दि.१०) रोजी सकाळी १०:३० वा. आदरपूर्वक श्रद्धांजली वाहिली. 
गोकुळदास शहा यांचे वृद्धापकाळाने शनिवारी सकाळी ७:०० वाजता दुःखद निधन झाले.ते  ८६ वर्षाचे होते. 
ते भाई नावाने जनमानसात परिचित होते.

यावेळी बोलताना संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे म्हणाले की,
 गोकुळदास शहा यांनी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अनेक वर्ष अध्यक्षपद व कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्षपद भूषवले.त्यांनी अतिशय पारदर्शक असा कारभार केला.त्यांचा इंदापूरच्या जडणघडणीत मोलाचा वाटा राहिला असून तालुक्यात शिक्षणाची क्रांती घडविण्यात देखील बहुमोल योगदान राहिले आहे.
शहरात त्यांना मानाचे स्थान होते.
त्यांच्या जाण्याने संपूर्ण शहरासह तालुक्यात दुःख व्यक्त होत आहे.
आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या  दुःखात सहभागी असल्याचे यावेळी ॲड.समीर मखरेंनी म्हटले आहे.