shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रहारचा अनोखा उपक्रम...एकल महिलेच्या हस्ते पुलाच्या कामाचा शुभारंभ !! मा. बच्चूभाऊ कडू यांचेकडून देवळाली प्रवराला तिस लाख रुपयांचा निधी..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. शनिवार दिनांक १० सप्टेंबर २०२२

प्रहारचा अनोखा उपक्रम...एकल महिलेच्या हस्ते पुलाच्या कामाचा शुभारंभ !! मा. बच्चूभाऊ कडू यांचेकडून देवळाली प्रवराला तिस लाख रुपयांचा निधी..!!

देवळाली प्रवरा : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याच्या देवळाली प्रवरा मध्ये स्थानिक नागरीकांच्या विनंती व प्रहार श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांचे मागणीवरून माजी राज्यमंत्री मा. बच्चूभाऊ कडू यांनी मंजूर केलेल्या भंडारदरा धरणाच्या कालव्यावर देवळाली प्रवरा मधिल काकडे - कदम - पठारे वस्ती पुलाच्या कामाचा तेथीलच इंदुबाई लहानू काकडे या एकल (विधवा) व जेष्ठ महीलेच्या हस्ते 
 नारळ फोडून शुभारंभ करणेत आला.
 
    प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाच्या श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस, प्रहार विधानसभा कार्यक्षेत्र कामगार सेलचे प्रमुख बाळासाहेब कराळे, देवळाली प्रवरा प्रहार चे संघटक सुनिल कदम, इंदुबाई लहानू काकडे, रोहिणी सुखदेव काकडे, पुष्पा जगन्नाथ काकडे, वैशाली बाबासाहेब काकडे, प्रियंका नवनाथ काकडे, दीपक सुखदेव काकडे, बाबासाहेब सुखदेव काकडे, सुखदेव यादव काकडे, जगन्नाथ मारुती काकडे, नवनाथ लहानू काकडे, नानासाहेब सुखदेव पठारे, बाबासाहेब सुखदेव पठारे, रावसाहेब सुखदेव पठारे, सुरेश सुखदेव पठारे, सोपान नामदेव कदम, शिवाजी नामदेव गांगुर्डे, शंकर नामदेव गांगुर्डे, सुनील नामदेव गांगुर्डे, सुनील कदम, श्लोक दीपक काकडे आदी मोठ्या संख्येने मान्यवर यावेळी उपस्थित होते.
 
     काकडे - कदम - पठारे वस्ती जवळील भंडारदरा धरणाच्या कॅनॉलवर ये जा करणेसाठी आवश्यक असलेल्या पादचारी लोखंडी पुलाचा प्रश्न गेली पन्नास वर्षे दुर्लक्षित होता.., 

       प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांच्या दि. २० जून २०२२ रोजीच्या लेखी मागणी नुसार देवळाली प्रवरा शहर हद्दीत प्रत्येकी जवळ्पास १० लक्ष रुपये खर्च असलेले तीन लोखंडी पुलांना तत्कालीन पाटबंधारे राज्यमंत्री मा. बच्चूभाऊ कडू यांनी तात्काळ मान्यता दिली.   

       १४ जुलै २०२२ रोजी पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांनी मंजूर झालेल्या पुलांची आप्पासाहेब ढुस यांचे सह प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली व तांत्रिक माहितीचा अहवाल वरिष्ठांना सादर केला.    
      या भूमिपूजन प्रसंगी बोलताना आप्पासाहेब ढुस यांनी म्हंटले की, देवळाली प्रवरा येथील कदम - काकडे.., वरखडे - नालकर.., व सांबारे - वाडकर या तिन वस्ती जवळील नागरिकांना भंडारदरा धरणाच्या कॅनॉल वर ये जा करणेसाठी अत्यंत गैरसोय होत होती, पाटाला पाणी आल्यावर येथील शाळकरी मुलांना जवळपास एक ते दोन किलोमीटर वळसा घालून शाळेत जावे लागत होते.., पाटाच्या दुतर्फा राहणाऱ्या शेतकऱ्यांना जनावरांचा चारा पाटातून वाहतूक करणेसाठी मोठी सर्कस करावी लागे.., आणि जर पाटाला पाणी असेल तर खूप लांबून चारा वाहतूक करावी लागत असे.., दूध उत्पादक शेतकरी यांना दूध वाहतूक आणि वयोवृध्द नागरिकांची पाट ओलांडताना होणारी गैरसोय पाहता वरील तीनही वस्तीवरील नागरिकांच्या लेखी मागणीवरून आम्ही दि. २० जून २०२२ रोजी प्रहार चे जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा पोटे यांचे मार्फत पाटबंधारे राज्यमंत्री मा. ना. बच्चूभाऊ कडू यांना निवेदन देऊन येथे तात्काळ लोखंडी पादचारी पूल करून मिळणेची मागणी केली होती. 

      नामदार बच्चूभाऊ कडू यांचे आदेशाने उपरोक्त ठिकाणी तात्काळ लोखंडी पादचारी पूल बसवून देणेकामी कार्यवाही सुरू झाली असून आज येथिल जेष्ठ एकल महीला इंदुबाई काकडे यांचे शुभहस्ते काकडे - कदम - पठारे या वस्तीवर दुसऱ्या पुलाचे भूमिपूजन करून आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. 

         आठ ते दहा दिवसांत एक या प्रमाणे तिन्ही पुलाचे काम पंधरा ते वीस दिवसात पूर्ण होणार असून त्यामुळे येथील शेतकरी, वयोवृद्ध नागरिक व शाळेत जाणारे विद्यार्थी यांची होणारी गैरसोय त्यामुळे दूर होण्यास मदत होणार असल्याचे ढूस यांनी सांगितले. 

       पन्नास वर्षांपासून आम्ही पाट ओलांडणे साठी खूप हाल अपेष्टा सहन केल्या असून प्रहार आमचेसाठी धाऊन आल्याने आमचे सर्व कष्ट दूर झाल्याची उस्फूर्त प्रतिक्रीया या प्रसंगी येथील महिलांनी दिली. हे सांगताना त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. त्यांना आनंदाश्रू अनावर झाले होते.

       श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रहार सदैव तत्पर असल्याचे सांगून या तीन पुलांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावल्याबद्दल पाटबंधारे विभागाचे सर्व अधिकारी यांचेसह प्रहार चे जिल्हाध्यक्ष अभिजीतदादा पोटे व नामदार बच्चूभाऊ कडू यांचे आप्पासाहेब ढुस यांनी प्रसंगी आभार व्यक्त केले.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close