घारगाव | वार्ताहार| 
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी परिसरातील वांदरकडा येथील छोट्याशा तळ्यात आंघोळीसाठी गेलेल्या चार मुलांना विजवाहक तारेचा शॉक लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवार ता.8 ऑक्टोबर रोजी दुपारी घडली आहे. या दुर्दैवी मृत्यूने पठारभागासह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनिकेत आरूण बर्डे, ओंकार अरुण बर्डे, दर्शन अजित बर्डे, विराज अजित बर्डे, अशी मृत्यू झालेल्या चारही मुलांचे नावे आहेत.

याबाबत समजेली माहिती अशी की शनिवारी दुपारी अनिकेत आरूण बर्डे, ओंकार अरुण बर्र्डेै, दर्शन अजित बर्र्डेै, विराज अजित बर्डे हे चौघे मुले खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या वांदरकडा येथील छोट्याशा तळ्यात चार मुले आंघोळीसाठी गेले होते. त्याच दरम्यान विजवाहक तारेचा शॉक लागून या चारीही लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या.घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, अशोक वाघ, रामनाथ कजबे, यांनीही घटनास्थळी धाव घेतली. नंतर जनार्दन आहेर यांच्यासह नागरिकांनी या चारीही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहे.
पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घारगाव पोलीस स्टेशनचे साहयक फौजदार राजू खेडकर, पोलीस नाईक राजेंद्र लांघे, हरिश्चंद्र बांडे, प्रमोद चव्हाण यांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. चारीही मुलांच्या दुर्दैवी मृत्यूने पठारभागासह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर चारीही मुलांच्या दुर्देवी मृत्यूने अनेकांना अश्रु अनावर झाले होते. तर आई- वडीलांनी हंबारडा फोडला होता. पावसामुळे रस्ता खराब झाल्याने चारीही मुलांचे मृतदेह झोळीच्या माध्यमातून नागरिकांनी रुग्णवाहिकेपर्यंत नेले होते. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी विजवितरण कंपनीच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला आहे