श्री नवले यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांना दिलेले निवेदनात म्हटले आहे की, उंचखडक खुर्द वि का सेवा सोसायटी चे सभासद श्री सिताराम कोंडाजी गायकर यांना दिनांक रोजी कर्ज वाटप केले आहे. श्री गायकर हे सोसायटी चे प्रथमच कर्ज उचलत होते. कर्ज खतावणी नंबर १०४ चा खातेउतारा पाहता ऊस मध्यम मुदत कर्ज उचलले आहे. या कर्जासाठी उंचखडक खुर्द येथील स.नं. ५/२ हि जमीन कर्ज बोजा फेरफार नंबर ३४२१निर्माण केला आहे. मात्र कर्ज दिनांक १७/१२/ २०१९ रोजी मंजूर व वाटप झाले आहे. कर्ज खतावणी नुसार इ करार २७/१२/२०१९ रोजी दिसत आहे. मात्र फेरफार ३४२१ हा दिनांक १४/२/२०२० रोजी तलाठी यांनी फेरफार नोंदवला आहे. तर मंडल अधिकारी यांनी दिनांक २७/४/२०२० रोजी मंजुरी दिली आहे. म्हणजे कर्ज वाटप झालेनंतर दोन महिन्याने तलाठी यांचेकडे नोंदणी झाली आहे. तर मंडल अधिकारी यांनी आर्थिक वर्ष संपले नंतर मंजुरी दिली आहे. चार महिने इ करार म्हणजे कर्ज बोजा जमिनीवर चढवणे आधी कर्ज वाटप झाले आहे.
जिल्हा बँकेचे अधिकारी यांनी राजकीय दबाव पोटी हे कर्ज वाटप केले आहे. पूर्वीपासून कर्ज घेणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांना एक एक कागदपत्रे साठी त्रस्त करणारे अधिकारी असे कसे मेहराबान झाले आहेत. कर्जासाठी जुने फेरफार एक नसेल तरीही कर्ज प्रकरण परत पाठवणारे अधिकारी इ करार चा फेरफार न पाहता कर्ज वाटप कसे करू शकतात. याकर्ज वाटप प्रकरणात असलेलं सोसायटी चे सचिव, जिल्हा बँक शाखाधिकारी, बँक इन्स्पेक्टर, तालुका विकास अधिकारी, तालुका व जिल्हा लोन अधिकारी, लेखा परीक्षक यांच्या वर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन सहकार मंत्री ना. अतुल सावे, सहकार आयुक्त पुणे, विभागीय सह निबंधक नाशिक, जिल्हा उप निबंधक, नगर, तालुका निबंधक अकोले यांना देण्यात आले आहे.

