shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वांबोरी पाणी योजनेचा कार्यारंभ आदेश प्राप्त ; ४० कोटी ५७ लाखांची पाणीयोजना लवकरच- माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची माहिती..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ११ ऑक्टोंबर २०२२

वांबोरी पाणी योजनेचा कार्यारंभ आदेश प्राप्त ; ४० कोटी ५७ लाखांची पाणीयोजना लवकरच- माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची माहिती..!!

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे मानले आभार..!!

राहुरी : वांबोरी पाणी योजनेसाठी कार्यारंभ आदेश 
राहुरी तालुक्यातील वांबोरी व वाड्या वस्त्यांसाठी पिण्याच्या पाणी योजनेस कार्यारंभ आदेश मिळाले असल्याची माहिती मा.मंत्री आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांनी दिली. 
     
       अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की ,वांबोरी व वाड्या वस्त्यांकरीता नागरिकांना शुद्ध व मुबलक पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून जलजीवन मिशन योजने अंतर्गत योजनेत समावेश करण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रालयात वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या योजनेसाठी दि.11 एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व प्रादेशिक प्राधिकरण नाशिक यांच्या तांत्रिक समितीने मान्यता दिली होती. दि.11 मे 2022 रोजी या योजनेला रु.40 कोटी 57 लाख रुपयांची महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा विभागाची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. 
        या नवीन योजनेमुळे प्रति व्यक्ती 55 लिटर पाण्याची तरतुद करण्यात आली असुन वांबोरी व वाड्या वस्त्यावर पुर्ण दाबाने मुबलक शुध्द पाणी पुरवठा होण्यास मदत होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन प्रतिक्षेत असलेली हि योजना प्रत्यक्षात साकारणार असल्याने वांबोरी व परीसरातील नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. 
      राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील विविध नवीन पाणी योजनेचे कामे हाती घेण्यात आलेले आहे. या संबंधीचे प्रस्ताव तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रालयात दाखल करण्यात आले होते तसेच काही योजनांचे कार्यारंभ आदेश होवुन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होवुन कामे प्रगतीपथावर असल्याचे तनपुरे यांनी सांगितले. 


       या योजनेसाठी जलजीवन मिशन अंतर्गत स्थानिक तालुका ,जिल्हा व नाशिक विभाग तसेच मंत्रालय स्तरावर अधिकाऱ्यांच्या विविध बैठका घेण्यात आलेल्या होत्या व येणाऱ्या त्रुटी दूर करत प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. वेळोवेळी पाठपुरावा करत असल्याने प्रशासकीय मान्यता मिळविण्यात अडचणी आल्या नाही. आता या योजनेला कार्यारंभ आदेश निघाल्याने लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार असल्याचे तनपुरे यांनी सांगितले.

       2019 च्या विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात असल्याचे आमदार तनपुरे यांनी नमूद केले. या महत्वाच्या पाणीपुरवठा योजनेला आता सुरवात होणार असल्याने वांबोरी, परीसरातील जनतेने तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांनी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे  यांचे आभार मानले आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
 
close