shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिठेवाडी येथे श्री.बिरोबा देवाची यात्रा उत्साहात साजरी.

पिठेवाडी येथे श्री.बिरोबा देवाची यात्रा उत्साहात साजरी.
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक ९ ऑक्टोबर २०२२ रोजी पिठेवाडी तील जागृत ग्रामदैवत श्री बिरोबा  देवाची कोजागिरी पौर्णिमेला सालाबाद प्रमाणे याही वर्षी सर्व ग्रामस्थांच्या वतीने यात्रा भरवण्यात आली होती. या यात्रेमध्ये देवाची सकाळी महा अभिषेक व होम हवन करून पूजा ढोलांच्या वाद्यासह आरती करण्यात आली. यानंतर बिरोबा देवाच्या नाम घोषवाची भाकणूक या ठिकाणी संपन्न झाली. या देवाला पुरणपोळ्याचा नैवेद्य, पेढे, नारळ इत्यादी अर्पण केले जातात. पिठेवाडी गावाचे ग्रामदैवत जागरूक देवस्थान असल्याने या देवाची पवित्रता ग्रामस्थांच्या वतीने पाळली जाते. तसेच देवस्थान परिसर हा अतिशय देखणा दिसतो. पूर्ण परिसरात काँक्रिटीकरण करून ठिकठिकाणी वेगवेगळी झाडे लावण्यात आल्याने अतिशय रम्य असे वातावरण या ठिकाणी निर्माण झालेले दिसून आले आहे. भक्तांच्या वतीने या ठिकाणी आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलेली होती. या देवाच्या यात्रेनिमित्त प्रत्येकाच्या घरी पाहुणे तसेच बाहेरगावी कामासाठी गेलेले गावकरी मुले मुली आवर्जून या दिवशी गावामध्ये येतात. त्यामुळे सर्व गावातील एकमेकांची यानिमित्ताने भेटीगाठी होतात असा एकोपा टिकवणारा आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारा हा यात्रा उत्सव गावाच्या आनंदाचा दिवस म्हणून ओळखला ही जातो. या दिवशी लाखेवाडी येथील जय भवानी माता( टेंबेआई) च्या दर्शनाला गावातील सर्व लहान थोर आवर्जून सकाळी दर्शन घेऊन येतात. या गावांमध्ये सर्व जाती धर्मातील लोकांना आपुलकीची सर्वांकडून वागणूक मिळते. दुपारच्या वेळी या ठिकाणी भंडाऱ्याची उधळण करीत परंपरेनुसार गजी ढोल कार्यक्रम संपन्न होतो. यामध्ये ज्येष्ठ व तरुण वर्गाचा समावेश असतो.संध्याकाळी सामूहिक पंगत झाल्यानंतर सर्व घरांमध्ये आपापल्या पद्धतीने जेवणावळ होत असते.
close