रोटरी क्लब ऑफ इंदापूरच्या पदाधिकाऱ्यांनी व महिलांनी भव्य दांडिया महोत्सवाचा लुटला आनंद
इंदापूर प्रतिनिधी: गेली दोन वर्षापासून कोरोना काळामुळे दांडीया चा आनंद घेता आला नाही परंतु यावर्षी निर्बंध मुक्त केल्याने या दांडीया चा आनंद मिळावा म्हणून इंदापूर शहरात रोटरी क्लब ऑफ इंदापूर च्या वतीने दांडिया जल्लोष २०२२ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात देवीच्या आरतीने या कार्यक्रमाचे प्रायोजक नेचर डिलाईट डेअरी चेे अध्यक्ष अर्जुन देसाई यांच्या हस्ते करण्यात आली.यामध्ये रोटरी क्लबचे सर्व रोट्रीयन व मोठ्या प्रमाणात महिला भगिनींनी दांडिया चा जल्लसाचा उत्साह पूर्वक आनंद लुटला. नेत्र दीपक अशा दांडिया इंदापूर मध्ये शहा सांस्कृतिक भवन येथे पाण्यास मिळाला. सर्व स्तरातील लहान थोरांनी या दांडिया मध्ये सहभाग नोंदवल्याचे दिसून आले. या दांडियामध्ये काही जोड्यांनी दांडिया खेळून दाखवला तसेच लहान मुलांनीही दांडिया मध्ये त्यांचे सादरीकरण करून दाखवले .तसेच दांडिया खेळण्यासाठी साजेसा वेशभूषा याचेही आकर्षक दर्शन या दांडियामध्ये पाहण्यास मिळाला. ज्येष्ठ नागरिक असूनही या दांडिया मध्ये उत्तम पद्धतीने तरुणांना प्रेरक वाटेल असे दांडिया खेळ खेळले. दांडिया खेळत असताना वेगवेगळ्या खवय्यांसाठी फूड फेस्टिवल चेही आयोजन या ठिकाणी केले होते त्याचाही लाभ या ठिकाणी घेण्यात आल्याची दिसून आले.
या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे संस्थापक प्रदीप गारटकर, अध्यक्ष नरेंद्र गांधी, मिलिंद कौलगी,सचिव सुनील मोहिते, खजिनदार नितीन शहा, माजी अध्यक्ष उदय शहा, भीमाशंकर शहा, महेंद्र रेडके ज्ञानदेव डोंबाळे नंदकुमार गुजर वसंत माळुंजकर, आझाद पटेल प्रशांत सीताप, राकेश गानबोटे, धरमचंद लोढा, मोरेश्वर कोकरे, प्रमोद भंडारी, हरिदास गवळी,अमर गायकवाड, सागर शिंदे, तसेच इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

