पळसदेव येथे दिव्यांग पाच टक्के निधीबाबतचे
दिव्यांगाचे बेमुदत धरणे उपोषण लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे.
इंदापूर प्रतिनिधी:आज दि.१० रोजी ग्रामपंचायत पळसदेव येथे प्रहार अपंग क्रांती संघटना इंदापूर यांच्यावतीने दिव्यांग पाच टक्के निधी मिळणेबाबत बेमुदत धरणे उपोषण करण्यात आले यावेळी माहितीचा अधिकार टाकुन माहिती घेण्यात आली होते. ग्रामसेवक यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. १५०० रु प्रत्येक दिव्यांगाच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल व उर्वरित निधी मार्च अखेर पर्यंत वर्ग करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर जि.उपाध्यक्ष बाबासाहेब पाडुळे जि.कार्याध्यक्ष बाबासाहेब जगताप इंदापूर ता.अध्यक्ष अंनतराव गायकवाड ता.सचिव रामदास चव्हाण ता.कार्याध्यक्ष नाना लावंड ता.महिला अध्यक्ष कु.दिपालीताई वाघमोडे पळसदेव शाखाध्यक्ष दादा शिंदे सणसर शाखाध्यक्ष दिलीप अंकुश अरुण गायकवाड पोपट दराडे चिखली शाखाध्यक्ष दिलीप रिटे इंदापूर शहर उपाध्यक्ष दादा पाटोळे विजु पवार आदि मान्यवर उपस्थित होते .

