लहान पोरांना सुध्दा कळतं
चांगल काय नि वाईट काय
जन्म देणाऱ्या आई-बापाला
विसरायचं नसतं बर काय
ज्यांनी आपणाला मोठ केलं
त्यांच्यामुळे प्रतिष्ठा मिळाली
अशा महान व्यक्तींना विसरली
अशी माणसं रसातळाला गेली
स्वार्थी लोकं फुटली
आयुष्यातुन उटली
चूक त्यांची कळली
माणुसकीला मुकली
तलवारीच्या पातीनं
परतवलं शिवरायांनी
पेनाच्या टोकानं
तारलं आंबेडकरनी
निकराची लढाई लढायची हाय
ती आत्मीयतेने जिंकायची हाय
आपला वैरी- वादी असला तरी
त्याला मना पासुन जिंकायचं हाय
चोहीकडं पसरलाय अंधार काळाकुट्ट
उजेडाकडं जायला पाहिजे वाट
पेटवुया हाती मशाल क्रांतीची
एकजुट करुन चालू विकासाची वाट
कवी:-सुरेश वडर(पुनाळकर)
मो.नं.9921218084

