shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

१५ दिवस नगर-मनमाड रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंदरस्ता दुरूस्तीसाठी निर्णय; वाहतुक पर्यायी मार्गाने वळविणार..!!


शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. मंगळवार दिनांक ११ ऑक्टोंबर २०२२

१५ दिवस नगर-मनमाड रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंद
रस्ता दुरूस्तीसाठी निर्णय; वाहतुक पर्यायी मार्गाने वळविणार..!!
१५ दिवस नगर-मनमाड रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंद..!!

अहमदनगर : नगर-मनमाड रस्ता दुरूस्तीच्या अनुषंगाने विळद बायपास चौक ते पुणतांबा फाटा दरम्यान अवजड वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरून होणार्‍या अवजड वाहतुकीत १५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर दरम्यान बदल करण्यात येणार आहे. दरम्यान यासंदर्भात नागरिकांच्या काही हरकती असल्यास त्यांनी १४ ऑक्टोबर, सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहर वाहतुक शाखेला कळविण्याबाबतचे आव्हान पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी नगर- मनमाड महामार्गावरील विळद बायपास चौक ते पुणतांबा फाटा दरम्यानची अवजड वाहतुक पर्यायी मार्गाने वळविणेबाबत विनंती केलेली आहे. विळद बायपास चौक ते पुणतांबा या मार्गावर प्रचंड प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असल्यामुळे दुरूस्तीच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात व्यत्यय येवून वाहतूक कोंडी होत आहे. सध्या पावसाळा सुरू असुन दुरूस्ती केलेल्या रस्त्यावरून अवजड वाहने लगेच जात असल्यामुळे पुन्हा रस्ता खराब होत आहे. त्याचप्रमाणे अवजड वाहनांमुळे अपघात होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने नगर-मनमाड या महामार्गावरील व पुणतांबा फाटापर्यंत अवजड वाहतुकीमध्ये १५ ऑक्टोबर ते दि. ३० ऑक्टोबर दरम्यान बदल करण्याचे नियोजित आहे.

माळवाडगाव येथील युवकाचा तळ्यात बुडून मृत्यू
नगर-पुणे-सोलापुरकडून मनमाडकडे जाणार्‍या सर्व प्रकारच्या अवजड वाहतुकीस विळद बायपास चौक येथून मनमाडकडे जाण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे. त्यांनी कल्याण बायपास चौक-नगर कल्याण महामार्गावरून आळेफाटा-संगमनेर मार्ग नाशिककडे किंवा विळद घाट-दूध डेअरी चौक- शेंडी बायपास, नगर-औरंगाबाद महामार्गावरून कायगाव-गंगापुर-वैजापुर येवला या मार्गाचा वापर करावा. तसेच शनिशिंगणापुर, सोनई रोडवरून मनमाड (राहुरीकडे) येणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांकरीता राहुरीकडे येण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे. त्यांनी सदर मार्गावरील वाहतूक नगर-औरंगाबाद महामार्गावरून इच्छित जातील.

१५ दिवस नगर-मनमाड रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंद....

मनमाड-येवला-शिर्डीकडून नगरमार्गे पुणेकडे सर्व प्रकारच्या अवजड वाहतुकीस पुणतांबा फाटा येथुन नगरकडे येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यांनी पुणतांबा फाटा येथुन चंदे कासार-संगमनेर-आळेफाटामार्गे अवलंब करायचा आहे. मनमाड-येवलेकडुन नगर, सोलापुर, बीडकडे येणार्‍या सर्व प्रकारच्या अवजड वाहतुकीस पुणतांबा फाटा येथून नगरकडे येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. सदर रोडवरील सर्व प्रकारची वाहतुक पुणतांबा फाटा येथून वैजापुर- गंगापूर-कायगाव-प्रवरासंगम-शेंडी बायपास-विळद घाट-केडगाव बायपासमार्गे जाणार आहे.


लोणीबाभळेश्वर-श्रीरामपुरकडे येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतुक बाभळेश्‍वर- श्रीरामपूर- टाकळीभान-नेवासामार्गे नगरकडे जाणार आहे. प्रस्तुतः आदेश बस, अत्यावश्यक मालाची वाहतुक करणारी वाहने, रस्ता दुरूस्तीकरीता आवश्यक वाहने व स्थानिक प्रशासनाकडुन अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
 
close