shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ठाकरे गटाला चिन्हं मिळालं ; ठाकरे आणि शिंदे गटाला मिळाली अशी नाव..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ११ ऑक्टोंबर २०२२

ठाकरे गटाला चिन्हं मिळालं ; ठाकरे आणि शिंदे गटाला मिळाली अशी नाव..!!

अहमदनगर : उद्धव ठाकरे यांना ‘धगधगती मशाल’ हे चिन्हं मिळाला असून, त्यांच्या गटाचे नाव हे ‘ शिवसेना उद्धव बाळासाहेव ठाकरे’ असणार आहे. एकनाथ शिंदे गटाला ‘बाळासाहेब शिवसेना’ असं नाव मिळालं आहे.

शिवसेना फुटीनंतर आज ठाकरे आणि शिंदे गटाकडून शिवसेनेवर दावा सांगितला जाताेय. यातच शिवसेनेचा शिंदे गट हा सत्तेत असून, एकनाथ शिंदे हे स्वतः मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची संघटना असून, ते पक्षप्रमुख पदावर आहेत. यातच अंधेरीची निवडणूक लागली आहे. आता दाेन्ही गटाकडून उमेदवार दिला जाणार आहे. याच वेळी दाेन्ही गटाने शिवसेना आणि पक्षाचे चिन्हावर दावा सांगितला हाेता. केंद्रीय निवडणूक आयाेगाने शिवसेना नावासह चिन्हं देखील गाेठवलं आहे. यानंतर दाेन्ही गटाला पर्याय सुचविण्यास सांगितले हाेते. तिथंही शिंदे गटाकडून ठाकरेंनी जे चिन्हं सुचविले तेच सांगितले गेले. यातून कुरघाेडीचे राजकारण झाले.


दाेन्ही गटाकडून काही चिन्हं सुचविण्यात आले. त्यातही एकनाथ शिंदे गटानं ठाकरे गटांचेच चिन्हं सुचवले. यात ठाकरे गटाकडून ‘त्रिशूल’ आणि शिंदे गटाकडून ‘गदा’, ही चिन्हं दिली हाेती. यावर केंद्रीय निवडणूक आयाेगानं यात पुन्हा वादग्रस्त निर्णय दिला. आयाेगाच्या निर्णयानुसार ही दाेन्ही चिन्हं ठाकरे आणि शिंदे गटाला वापरता येणार नाहीत. ही दाेन्ही चिन्हं धार्मिक प्रतीके आहेत, असे सांगत आयाेगाने ही चिन्हं देण्यास नकार दिला.

ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयाेगाकडे तीन चिन्हं दिली हाेती. यात ‘त्रिशूल’, ‘धगधगती मशाल’ आणि ‘उगवता सूर्य’, अशी ही चिन्हं हाेती. यातील ‘त्रिशूल’ हे चिन्हं आयाेगाने रद्द ठरवले. यानंतर शिंदे गटाकडून ‘गदा’ हे चिन्हं देखील रद्द ठरवले. दाेन्ही चिन्हे हे धार्मिक प्रतीक असल्याचे निवडणूक आयाेगाचे म्हणणे आहे. याचबराेबर ठाकरे गटाकडून शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबाेधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव ठाकरे ही तीन नावे उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयाेगाला दिली आहे. या नावांवर निवडणूक आयाेगानं निर्णय दिला आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
 
close