प्रतिनिधी : संजय वायकर
अहमदनगर : १० / सेवार्थ प्रतिष्ठाण निर्मलनगर, पोलिस कॉलनी अहमदनगर येथे शारदीय नवरात्रोत्सव निमित्त सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील सेवार्थ प्रतिष्ठाण मार्फत कोजागिरी निमित्त ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता भंडाऱ्याचे (महाप्रसादाचे ) व दुध वाटपाचे आयोजन करण्यात आले . अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमास हजेरी लावली .
परिसरातील नागरिकांनी देवी भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला . भविष्यात नागरिकांसाठी विविध सामाजिक उपक्रमाचे वर्षभर आयोजन करणार असल्याचे यावेळी प्रतिष्ठाणचे संस्थापक वैभव पोकळे यांनी सांगितले .

