बावडा येथे मातंग एकता आंदोलन संघटनेची आढावा बैठक
इंदापूर प्रतिनिधी: आज दि:११ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्य मंत्री व मातंग एकता अंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखालील व मातंग एकता अंदोलन संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष ललेंद्र भाऊ शिंदे यांच्या उपस्थितीत बावडा गेस्ट हाऊस येथे मातंग एकता आंदोलन इंदापूर तालुका अध्यक्ष शरद गायकवाड यांनी आढावा बेठकीचे नियोजन केले होते.
बावडा जिल्हा परिषद गटा मद्ये गाव तिथे शाखा करण्याचे नियोजन झालेले असुन त्या संदर्भात टणु, पिंपरी, ओझरे ,गणेशवाडी, लुमेवाडी, खोरोची, निरवांगी,निमसाखर, वडापुरी, रेडणी, बावडा मातंग एकता अंदोलन संघटना या शाखा ओपन करण्याचेआयोजित केले
.या कार्यक्रमात मातंग एकता अंदोलन संघटनेचे महाराष्ट्र महीला प्रदेश सचिव अनिताताई गायकवाड,तानाजी साठे, मातंग एकता अंदोलन संघटनेचे युवक तालुका अध्यक्ष सोनु ढावरे, संदीप मोहीते, कृष्णा कुचेकर, पपु रणदिवे, अमोल साठे,इंदापूर शहर अध्यक्ष अनिकेत सानप, विलास रास्ते (मेजर),वजिर मिसळ, अनिल जगताप, हनुमंत खंडागळे, आबा दिनकर गायकवाड,अक्षय खरात, पंजाब गायकवाड, विजय गायकवाड वडापुरी इ उपस्थित हेते.
या कार्यक्रमाचे आभार चिंतामणी गायकवाड यांनी केले.

