shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रत्येकाला अडचणी आहेत. पण ते ही दिवस जातील म्हणून जिद्ध ठेवून व त्यावर मात करून, संघर्ष करा, नक्कीच तुमचे आयुष्य सुंदर होईल - आ. दत्तात्रय भरणे

प्रत्येकाला अडचणी आहेत. पण ते ही दिवस जातील म्हणून जिद्ध ठेवून व त्यावर मात करून, संघर्ष करा, नक्कीच तुमचे आयुष्य सुंदर होईल - आ. दत्तात्रय भरणे 

इंदापूर येथे टाटा ट्राईव्ह कडून ४५० विद्यार्थ्यांना मोफत आयटी प्रशिक्षण : शौर्य प्रतिष्ठानचा उपक्रमाला तरुणांचा प्रतिसाद 
फोटो ओळ : इंदापूर गुरूकृपा मंगल कार्यालयात आयटी मार्गदर्शन कार्यशाळेत युवकांना संबोधित करताना आमदार दत्तात्रय भरणे, राहुल गुंडेकर, श्रीराज भरणे व टाटा समूहाचे अधिकारी व मान्यवर


इंदापूर : आपल्या आयुष्यात नेहमी संधी भेटत असताना, त्यासाठी कोणत्यातरी व्यक्ती व संस्था जबाबदार असते.  आपले काहीतरी काम पूर्ण होते असते. तर आपण त्या माणसाला कधीही विसरू नये. तसेच प्रत्येकाच्या  आयुष्यात टेन्शन आहे. प्रत्येकाला अडचणी आहेत. पण ते ही दिवस जातील म्हणून जिद्ध ठेवून व त्यावर मात करून, संघर्ष करा, नक्कीच तुमचे आयुष्य सुंदर होईल असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले. 
 
इंदापूर येथील गुंडेकर यांच्या गुरुकृपा मंगल कार्यालयात, युवक नेते श्रीराज भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त शौर्य प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून, टाटा ट्राईव्ह कंपनीच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील ४५० विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रातील विविध कोर्सेबाबत मोफत मार्गदर्शन व कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी युवक नेते श्रीराज भरणे, शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राहुल गुंडेकर, ऋषिकेश काळे, सदस्य विजय आवटे, प्रतीक झोळ, प्रज्वल गायकवाड, निखिल कारंडे, प्रसाद चेंडके, योगेश कुठे, रोहित मखरे व विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी आमदार  दत्तात्रय भरणे बोलत होते. 
यावेळी बोलताना युवक नेते श्रीराज भरणे म्हणाले की, तरुणांची आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चिती करणे गरजेचे आहे. तरुणांनी मार्गदर्शन घेवून, जबाबदारीची जाणीव ठेवून वाटचाल पुढे वाटचाल केल्यास ध्येयप्राप्ती निश्चितच होणार आहे. तालुक्यातील तरुणांनी शैक्षणिक, कला, क्रीडा व अशा अनेक विषयात  काही मदत लागल्यास कळवावे. आपणास आमदार दत्तात्रय भरणे मित्र परिवाराच्या वतीने नक्कीच प्रयत्न करण्यात येईल. अशी ग्वाही श्रीराज भरणे यांनी दिली. 

यावेळी कार्यशाळेत इंदापूर तालुक्यातील ३०० तरुणांनी सहभाग घेतला. तर बारामती, दौंड, माळशिरस, अकलूज, फलटण, टेंभुर्णी, पुणे, मुंबई, सोलापूर, धाराशिव, हडपसर अनेक भागातून १५० युवकांनी ऑनलाईन हजेरी लावली होती. यावेळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर माहीती तंत्रज्ञान कंपन्यांना मागणी असलेल्या, सर्व कोर्सेसची परिपूर्ण माहिती प्रशिक्षण दरम्यान देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यात आल्या. तसेच आयटी ऑटोमोबाईल्स क्षेत्रातील ही माहिती देण्यात आली. तर कार्यक्रम ग्रामीण भागात पोहचविन्यासाठी विद्या प्रतिष्ठानचे प्रा. साठे, प्रा. सरफराज शेख, प्रा. काळदाते, प्रा. सुदर्शन आवटे यांनी सहकार्य केले. 

चौकट : टाटा समूहाकडून तरुणांना मिळणार नौकऱ्या 

ही आयटी मार्गदर्शन कार्यशाळा पूर्ण केलेल्या युवक युवतींना, कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे. त्यानंतर टाटा स्ट्राईव्ह कंपनीच्या नियमानुसार नौकारीची संधी मिळणार आहे. त्यावेळी ज्यांना शैक्षणिक कागदपात्रांची अडचण येईल. त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. तसेच युवकांना त्यांच्या अंगी असलेल्या कौशल्याचा विचार करूनच, त्यांच्या मुलाखतीवर नौकरी मिळणार आहे. तालुक्यातील एक हजार युवक युवतींना नौकऱ्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. अशी ग्वाही शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल गुंडेकर यांनी सांगितले. 


close