shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त श्रीमती हौ.पां.घोरपडे विद्यालय पिंपळी शाळेत विविध स्पर्धा संपन्न.

शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त श्रीमती हौ.पां.घोरपडे विद्यालय पिंपळी शाळेत विविध स्पर्धा संपन्न.

विज्ञान प्रदर्शन आणि ग्रंथ प्रदर्शनाचे केले होते आयोजन.
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक १२ डिसेंबर २०२२ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष व मा.केंद्रिय कृषिमंत्री लोकनेते शरद पवार  यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त श्रीमती हौ.पां.घोरपडे विद्यालय पिंपळी शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करून करण्यात आले होते त्यामध्ये रांगोळी स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,विज्ञान प्रदर्शन आणि ग्रंथ प्रदर्शन आयोजित केले.
   या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री छत्रपती सह-साखर कारखान्याचे विद्यमान संचालक संतोष ढवाण पाटील हे होते.तसेच पिंपळी-लिमटेक गावचे सरपंच सौ.मंगलताई केसकर,उपसरपंच आबासाहेब देवकाते पाटील,बारामती फलोत्पादन संघाचे मा.चेअरमन काशिनाथ घोरपडे,बारामती फलोत्पादन संघाचे मा.संचालक उत्तमराव मदने ,बारामती खरेदी-विक्री संघाचे मा.व्हा.चेअरमनभाऊसाहेब भिसे,पिंपळी-लिमटेक विविध कार्यकारी सोसायटीचे मा.चेअरमन अशोकराव देवकाते पाटील,मा.उपसरपंच  राहुल बनकर,तसेच  ग्रामस्थ   हरिभाऊ केसकर,विलास ठेंगल आणि महेश चौधरी हे सर्व  प्रमुख पाहुणे उपस्थित होते. 
यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सर्व स्पर्धेच्या वर्गखोली दालनाचे उदघाटन करण्यात आले सर्व मान्यवरांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक  निंबाळकर एन.एल. सरांनी स्वागत केले. तसेच वरील स्पर्धेमध्ये पहिले  तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात  आले. 
या कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षक,शिक्षिका आणि शिक्षकेतर या सर्वांनी केले. फलकलेखन कु.फडतरे मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बनकर डी.बी.सरांनी केले.
close