आंतरराष्ट्रीय इंग्रजी ऑलिंपियाड मध्ये गुरुकुल गोखळीच्या विद्यार्थ्यांनी मिळवले यश
नील गाडेकर,पियुष घोडके,संबोधी मोरे या विद्यार्थ्यांनी मिळवले उत्तम यश.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील गोखळी येथील गुरुकुल विद्या मंदिर मधील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या इंग्रजी ऑलिंपियाड (science Olympiad Foundation) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये सदर परीक्षेत गुरुकुल विद्यामंदिर, गोखळी मधील विद्यार्थी सहभागी झाले होते. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या परीक्षेत गुरुकुल विद्यामंदिर मधील नील योगराज गाडेकर आंतरराष्ट्रीय स्थानिक ७ वा,
पियुष संतोष घोडके आंतरराष्ट्रीय स्थानामध्ये १५ वा तर कुमारी
संबोधी सुहास मोरे हिचा आंतरराष्ट्रीय स्थानी ८७७ वा क्रमांक मिळवून द्वितीय स्थानासाठी साठी पात्र ठरलेले आहेत. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल गुरुकुल विद्या मंदिरातील प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी त्याचे अभिनंदन केले.

