shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"संजीवन इंग्रजी वाचन प्रकल्पाची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून दखल ; संजीवन दिवे यांना अभिनंदन पत्र

आनंददायी शिक्षण, जिल्हा परिषद शाळेत सुरू आहे" संजीवन इंग्रजी वाचन प्रकल्प " जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी वाचू लागली इंग्रजी खडा खडा ! जिल्हा परिषद अहमदनगरचे  मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर (आय.ए.एस.) यांनी घेतली "संजीवन इंग्रजी वाचन प्रकल्पाची "दखल. शिक्षण विस्तार अधिकारी संजीवन दिवे यांना दिले अभिनंदन पत्र. विद्यार्थ्यांमध्ये लागली इंग्रजी वाचण्याची चढावड. इंग्रजी वाचन प्रकल्पाचे सर्व स्तरातून कौतुक.

अजिज शेख । राहाता:-
शिक्षण विस्तार अधिकारी संजीवन दिवे यांनी स्वतःच्या संकल्पनेतून राहाता तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास करण्यासाठी व विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने इंग्रजी वाचन करावे यासाठी "संजीवन इंग्रजी वाचन प्रकल्प" सुरू केलेला आहे. हा प्रकल्प कमी कालावधीत विद्यार्थी,पालक व शिक्षकांमध्ये लोकप्रिय झाला आहे. या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना वाचन करायला कसे शिकवायचे? याचे प्रात्यक्षिक संजीवन दिवे यांनी  विद्यार्थी व शिक्षक यांना एकत्रित घेऊन दाखविले. श्रवण,भाषण, वाचन, लेखन या भाषा कौशल्यावर आधारित हा प्रकल्प असल्याने यशस्वी होत आहे. अधिकारी स्वतः हातात पुस्तक घेऊन विद्यार्थ्यांना अध्यापन करतात. ही अचंबित करणारी बाब आहे. संजीवन दिवे यांच्या या संकल्पनेतून विद्यार्थी व शिक्षक यांना  प्रेरणा मिळाली. शिक्षक विद्यार्थ्यांचा दररोज इंग्रजी वाचनाचा सराव घेत आहेत.

विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनाची गोडी व आवड निर्माण झाली आहे. ते आनंदाने इंग्रजी वाचून दाखवत आहेत. घरी गेल्यानंतर विद्यार्थी पालकांकडूनही इंग्रजी वाचण्यासाठी सहकार्य घेत आहेत. संजीवन दिवे शाळा भेटी व मार्गदर्शन करताना जे विद्यार्थी चांगले इंग्रजी वाचन करतात. त्यांचा इंग्रजी वाचनाचा व्हिडिओ मोबाईल मध्ये काढतात व तो स्वतःच्या मोबाईल स्टेटसला ठेवत आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे इंग्रजी वाचन स्टेटस पाहून अनेक ठिकाणावरून अभिनंदन होऊ लागले आहे.

यातूनच संजीवन दिवे यांना या प्रकल्पाचा प्रसार व प्रचार करण्याची संकल्पना सुचली. जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक विद्यार्थ्यांचे इंग्रजी वाचण्याचे व्हिडिओ काढून स्वतःच्या मोबाईल स्टेटसला ठेवत आहेत.गावातील नागरिक, नातेवाईक, मित्रमंडळी मोबाईल स्टेटसवर विद्यार्थ्यांच्या इंग्रजी वाचण्याचे व्हिडिओ  पहात आहेत. या प्रकल्पामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये माझा स्टेटस ठेवला जाणार यातून इंग्रजी वाचनाची चढाओढ लागली. संजीवन दिवे यांनी अनेक शाळांमध्ये पालक सभा घेऊन, आपल्या पाल्याच्या शिक्षणामध्ये पालकांनी त्यांचा अभ्यास प्रबोधन करत आहेत. पालक सभांमध्ये संजीवन दिवे यांनी मार्गदर्शन करावे. अशी मागणी पालक वर्गातून व शिक्षक वर्गातून येत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते. माझा इंग्रजी वाचनाचा व्हिडिओ  तयार करून माझ्या शिक्षकांनी त्यांच्या टेटस ला ठेवावा. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रेरणा मिळून टप्प्याटप्प्याने शंभर टक्के विद्यार्थी इंग्रजी वाचन करण्याचा सराव करत आहेत. या प्रकल्पामुळे विद्यार्थी व शिक्षक यांच्यामधील समन्वय वाढला आहे. पालक क्रियाशील होत आहेत. इंग्रजी वाचनाचा स्टेटस ठेवल्यामुळे  शिक्षक, विद्यार्थी, पालक व शिक्षण विभागाची प्रतिष्ठा वाढत आहे. जिल्हा परिषद शाळांबद्दल गावातील नागरिकांमध्ये चांगला संदेश जात आहे. विद्यार्थी शिक्षक,पालक यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होत आहे.संजीवन इंग्रजी वाचन प्रकल्प एक दिशादर्शक प्रयोग संजीवन दिवे यांनी स्वतःच्या संकल्पनेतून यशस्वी करून दाखविला आहे. या उपक्रमासाठी  " संजीवन इंग्रजी वाचन प्रकल्प" हा यूट्यूब चैनल सुरू केलेला आहे. राहता तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा इंग्रजीमध्ये प्रगतीपथावर दिसून येत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषयाचा पाया पक्का होत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये जाणीवपूर्वक दर्जेदार शिक्षण मिळण्यास प्रोत्साहन मिळत आहे.

एका शिक्षकाचा उपक्रम पाहून अनेक शिक्षक प्रेरित होताना दिसून येत आहेत. राहता तालुक्यातील 337 शिक्षकांनी स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदविला आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ,अधिकारी यांच्यातील दरी कमी होऊन शैक्षणिक विचारांची देवाण-घेवाण सुरू होत आहे. या प्रकल्पामुळे विद्यार्थी व शिक्षकांना एक प्रकारची इंग्रजी वाचनाबाबत दिशा मिळाली आहे. लहान लहान विद्यार्थ्यांचे व पालकांचे गावात कौतुक होत आहे. इंग्रजी वाचन शिकण्यासाठी विद्यार्थी स्वतःहून पुढे येत आहेत. आपणही उत्तम इंग्रजी वाचू शकतो. हा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत आहे. या प्रकल्पामुळे विद्यार्थी,पालक,शिक्षक सर्व खुश आहेत. या प्रकल्पाची विशेष दखल जिल्हा शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांनी घेऊन समाधान व्यक्त केले आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी शिक्षण विस्तार अधिकारी संजीवन दिवे यांच्या कार्याची दखल घेऊन अभिनंदन पत्र दिलेले आहे. या प्रकल्पाचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
close