राहुरी-अवैध वाळू उपसाविरोधात पोलीस प्रशासनाची कारवाई मोहीम, ७ लाखांच्या मुद्देमालासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल..!!
शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक १३ डिसेंबर २०२२
राहुरी : नगर जिल्ह्यामध्ये अवैध वाळू उपसाविरोधात सध्या पोलीस प्रशासनाने धडक कारवाईची मोहीम हाती घेतली असून राहुरी तालुक्यातील मुळा नदी पात्रामध्ये आणि तनपुरेवाडी येथे 7 लाख 30 हजार किमतीची वाळू आणि इतर साहित्य मुद्देमालासह 2 वाळू तस्करांना ताब्यात घेण्यात आले. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
भिमराज गुलाब बर्डे (25, रा. बारागाव नांदुर ता राहुरी, जि. नगर), राजेंद्र अर्जुन गुंजाळ (26, रा. मुलणमाथा, राहुरी बु ता. राहुरी जि. अ. नगर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, तनपुरेवाडी रोड ता. राहुरी गावचे शिवारातील तनपुरेवाडी रोडने राहुरीच्या दिशेने जाणारी गाडी पकडण्यात आली. या गाडीमध्ये 14 लाख कि.चा एक विना क्रमांकाचा टाटा कंपनीचा विटकरी रंगाचा 909 टेम्पो जु.वा. कि. अंदाजे, 20 हजार रु. किमतीची 02 ब्रास शासकीय वाळू, असा एकूण 4,20,000 /- रुपयांचा मुद्देमाल केला आहे.
दुसऱ्या कारवाईमध्ये, डिग्रस ता. राहुरी गावच्या शिवारातील मुळा नदी पात्रामध्ये एक इसम त्यांच्याकडील पांढऱ्या रंगाच्या झेनॉनमधून शासकीय वाळूची चोरी करून वाहतूक करीत आहे, अशी बातमी मिळाली. त्यानुसार, पथकातील कर्मचाऱ्यांनी आरोपी भिमराज गुलाब बर्डे (25, रा. बारागाव नांदुर ता राहुरी, जि. नगर) यास जेरबंद केले. त्याच्याकडून 3 लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची झेनॉन गाडी, 10,000रुपये किमतीची ब्रास वाळू, असा एकूण 3,10,000/- एकूण मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा आणि विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सुरेश चंद्रकांत माळी, लक्ष्मण चिंधु , शंकर संपत चौधरी, रविकिरण बाबुराव सोनटक्के, रंजीत पोपट जाधव, राहुल भाउसाहेब सोळंके यांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

