इंदापूर रोटरी क्लबच्या वतीने कदम विद्यालयातील विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी
इंदापूर प्रतिनिधी:रोटरी क्लब ऑफ इंदापूर यांच्यावतीने अस्मिता प्रकल्पांतर्गत१००० विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी व गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे.त्यामधील पहिल्या टप्प्यातील तपासणी व मार्गदर्शन शिबिर रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनियर कॉलेज मध्ये आयोजित करण्यात आले होते.यामध्ये १३ ते १८ वर्षे वयोगटातील आठवी ते बारावी अखेरच्या विद्यार्थिनींना शारीरिक मानसिक बदल,आरोग्य, आहार, व्यायाम अंधश्रद्धा, सोशल मीडियाचा गैरवापर इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
त्यानंतर सर्व विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. ज्या विद्यार्थिनींच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असेल त्यांना गोळ्यांचे वाटप करण्यात आले तसेच सर्व विद्यार्थिनींना माहिती पुस्तकही देण्यात आले.
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष नरेंद्र गांधी यांनी अस्मिता प्रोजेक्ट विषयी विद्यार्थिनींना माहिती दिली. विद्यालयाचे प्राचार्य भास्कर वाबळे यांनी रोटरी क्लबच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
याप्रसंगी रोटरी क्लबचे सचिव सुनील मोहिते, माजी अध्यक्ष नंदकुमार गुजर, उपाध्यक्ष आझाद पटेल,धरमचंद लोढा,भीमाशंकर जाधव, खजिनदार नितीन शहा, उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुनील मोहिते यांनी केले.

