shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मैदानी स्पर्धेत कदम विद्यालयातील २० खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

मैदानी स्पर्धेत कदम विद्यालयातील २० खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
इंदापूर प्रतिनिधी:दिनांक १० व ११ डिसेंबर रोजी इंदापूर क्रीडा संकुल येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत विविध खेळ प्रकारात रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व ज्युनियर कॉलेज मधील खेळाडूंनी चांगली कामगिरी करून भरघोस यश संपादन केले.
१४ वर्षाखालील  व  १७ वर्षाखालील मुलींच्या  संघाने अनुक्रमे 4*100 मीटर रिले  व 4*400 मीटर रिलेत प्रथम क्रमांक पटकावला.
थाळीफेक मध्ये तृप्ती बोराटे हिने प्रथम तर हुलगुंडे रोहित याने  द्वितीय  मिळवला.
गोळा फेक मध्ये गौरी माने हिने प्रथम क्रमांक मिळवला तर शिवानी रायते हिने तृतीय क्रमांक मिळवला.
हातोडा फेक मध्ये सतरा वर्षाखालील मुलीमध्ये अंकिता ढावरे द्वितीय तर १९ वर्षाखालील मुलीमध्ये अल्फिया शेखने प्रथम क्रमांक मिळवला.
 सतरा वर्षाखालील मुले हातोडा फेकमध्ये अविनाश खरात प्रथम तर
१९ वर्षाखालील  सोहम साळुंखे प्रथम  व कैफ शेख याने  द्वितीय क्रमांक मिळवला.
१५०० मीटर धावणे स्पर्धेत  वैष्णवी वाघमोडे तृतीय क्रमांक मिळवला.
३००० मीटर धावणे स्पर्धेत  वैष्णवी काशीद द्वितीय तर करुणा मखरे हिने तृतीय क्रमांक मिळवला.तेजस्वी गोरे हिने
२०० मीटर धावणे स्पर्धेत  द्वितीय तर 
१०० मीटर धावणे स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला
वरील सर्व खेळाडूंना विद्यालयातील क्रीडाशिक्षक सुनील मोहिते यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाचे प्राचार्य भास्कर वाबळे, शाळा समिती सदस्य प्रदीप गारटकर, डॉ. श्रेणिक शहा, डॉ. लहू कदम, श्रीधर बाब्रस, विठ्ठल ननवरे ,कैलास कदम ,पर्यवेक्षिका पुष्पा काळे,रेश्मा शेख,मारोती जोगदंड,छाया पडसळकर,पालक शिक्षक संघ, शाळा व्यवस्थापन समिती यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
close