इंदापूर प्रतिनिधी: रयत शिक्षण संस्थेच्या सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लोकनेते शरदचंद्र पवार यांचा ८२ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन व संस्था सुवर्ण महोत्सवी योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.याप्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा छाया पडळकर बोलत होत्या.
पवार साहेबांनी मागील पन्नास वर्षांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य केले.कला, क्रीडा ,सांस्कृतिक ,शैक्षणिक,सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी करून आपले कर्तृत्व सिद्ध केले. रयत शिक्षण संस्थेसाठी विविध ठिकाणावरून देणग्या मिळवून संस्थेच्या भौतिक सुविधा व गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले. शरद पवार साहेबांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्र इतर राज्यापेक्षा आघाडीवर असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.आज वयाच्या ८२ व्या वर्षी सुद्धा न डगमगता अखंड समाजसेवेसाठी वाहून घेतलेले व्यक्तिमत्व म्हणजे पवार साहेब यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी समोर ठेवून परिश्रम घेतले पाहिजेत असे मत व्यक्त केले. यावेळी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. विद्यालयातील उपशिक्षक संजय माने यांनी वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. राष्ट्रवादी युवती महिला अध्यक्ष प्रतीक्षा बालगुडे यांनी मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य भास्कर वाबळे पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष मारुती जोगदंड उपाध्यक्ष रेश्मा शेख उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका पुष्पा काळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रिया भोंग यांनी केले सुनील मोहिते यांनी आभार मानले.

