shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला वाटते की खा.शरद पवार पंतप्रधान व्हावेत - सचिन सपकळ.

प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला वाटते की खा.शरद पवार पंतप्रधान व्हावेत - सचिन सपकळ.

खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तुषार सपकळ मित्रपरिवार त्यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ व कबड्डी किटचे वाटप .
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक १२ डिसेंबर २०२२ रोजी इंदापूर तालुक्यातील सपकाळ वाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सपकळवाडी व अंगणवाडी येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व कबड्डी किट वाटप तुषार सपकळ मित्रपरिवार यांच्यातर्फे करण्यात आले. 
यावेळी सचिन सपकळ यांनी शरद पवार  यांच्या संघर्षमय प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला वाटते की, शरद पवार  पंतप्रधान व्हावेत असे त्यांनी मनोगतात आपले मत व्यक्त केले.

 यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन  सपकळ सपकळवाडीचे जेष्ठ शिवाजी  सपकळ. शिवाजी जगन्नाथ सपकळ ,पृथ्वीराज सपकळ, सुनील भुजबळ ,योगेश सपकळ ,सुखदेव घाडगे, सरपंच तानाजी सोनवणे, राष्ट्रवादी युवा कार्यकर्ते तुषार  सपकळ,  महेश सपकळ, अजित सपकळ , कन्हैया वाघमारे, शुभम निंबाळकर ,गणेश सपकळ, तुषार सोनवणे ,ऋषिकेश सोनवणे ,नाळे सर ,भुजबळ मॅडम व विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी तुषार सपकळ मित्रपरिवार यांनी कबड्डी किट व खाऊ वाटप केल्याबद्दल गावातील ग्रामस्थांनी आभार मानले.
close