*विभागीय मैदानी स्पर्धेसाठी कदम विद्यालयातील १० खेळाडूंची निवड*
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक १५ व १६ डिसेंबर रोजी टी.सी. कॉलेज बारामती येथे जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत विविध खेळ प्रकारात रयत शिक्षण संस्थेच्या सौ कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व ज्युनियर कॉलेज मधील खेळाडूंनी चांगली कामगिरी करून भरघोस यश संपादन केले.
१४ वर्षाखालील मुलींच्या संघाने ४*१० मीटर रिले स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.या रीलेच्या संघात तृप्ती बोराटे,शिवानी रायते,धनश्री खरात, तेजस्वी गोरे व यशवी मखरे यांनी सहभाग घेतला.
थाळीफेक मध्ये तृप्ती बोराटे व
गोळा फेक मध्ये गौरी माने यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
हातोडा फेक मध्ये सतरा वर्षाखालील मुलीमध्ये अंकिता ढावरे व १९ वर्षाखालील मुलीमध्ये अल्फिया शेखने द्वितीय क्रमांक मिळवला.तर शिवानी राऊत व प्रियांका कुंभार यांनी तृतीय क्रमांक मिळवला.१९ वर्षाखालील सोहम साळुंके याने तृतीय क्रमांक मिळवला.कुस्तीमध्ये १७ वर्षा खालील मुलांच्या स्पर्धेत ६५ किलो वजन गटात विश्वजीत मदने याने प्रथम क्रमांक पटकावला.
वरील सर्व खेळाडूंना विद्यालयातील क्रीडाशिक्षक सुनील मोहिते यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाचे प्राचार्य भास्कर वाबळे, शाळा समिती सदस्य प्रदीप गारटकर, डॉ. श्रेणिक शहा, डॉ. लहू कदम, श्रीधर बाब्रस,विठ्ठल ननवरे ,कैलास कदम, पर्यवेक्षिका पुष्पा काळे,पालक शिक्षक संघ, शाळा व्यवस्थापन समिती यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

