shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुण्यात होणार राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन.

पुणे । प्रतिनिधी:-
भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवानिमित्ताने मराठी साहित्याचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान या विषयास वाहिलेले राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन पाचवे,  दिनांक २५ डिसेंबर २०२२ रोजी  पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह पद्मावती येथे ऍड. नंदू फडके यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे संमेलनाचे स्वागताध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष श्री श्याम भुरके भूषविणार आहेत. या संमेलनाचे उद्घाटन चॅम्पियन्स ऍकेडमीचे राजकुमारसिंह सोळंकी हे करणार आहे. 

संमेलनाच्या निमित्ताने सदगुरू श्री शंकर महाराज मठापासून निघणाऱ्या ग्रंथ दिंडीच्या भव्य मिरवणूकीत ७५  हुतात्म्यांची छायाचित्रे गळ्यात अडकवलेल्या तरूण तरूणींचा समावेश  असणार आहे.  

राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनात इतिहास, राष्ट्रभक्ती, पर्यावरण या विषयावरील  वीस पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे

साहित्य संमेलनामध्ये  सोपी मराठी भाषा, करियर निर्मितीतून राष्ट्र निर्माण, स्वातंत्र्य लढ्यातील धर्मादाय संस्थांचे कार्य,  स्वातंत्र्य लढ्यात निर्माण झालेले मराठी साहित्य तसेच  संविधानाचा अमृत महोत्सव अशा विविध विषयांवर मराठी काका श्री अनिल गोरे, डॉ. बबन जोगदंड, प्रा. विजय नवले, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे तसेच सह धर्मादाय आयुक्त श्री सु.मु. बुक्के व श्री.बि.डी कुलकर्णी यांची व्याख्याने होणार आहेत.

 राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाच्या निमित्ताने विशेष निमंत्रितांच्या राष्ट्रभक्ती कवी संमेलनाचे अध्यक्षपद काव्यशिल्प संस्थेचे अध्यक्ष श्री मिलिंद जोशी हे भूषविणार आहेत. 

राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचे औचित्य साधून शिक्षण, पालकत्व, करीअर मार्गदर्शन, संस्कृती व राष्ट्र निर्माण या विषयात उत्तुंग  कामगिरी करणाऱ्या प्रा. केदार टाकळकर  व सीए विनय गानू यांना जीवन गौरव पुरस्कार, वीणा गोखले यांना दातृत्व पुरस्कार, अशोक गुंदेचा यांना राष्ट्रभूषण पुरस्कार, अनिल शिनकर यांना ग्रंथ पुरस्कार, पै. मंगसुरकर यांना आंतरराष्ट्रीय धनगरी ढोलवादक, ज्ञानेश्वर कारंडे ज्येष्ठ नागरिक सेवा, सुप्रिया निवंगुणे योगशिक्षिका, सुरज घावरे युवा प्रवचनकार, निखिल खंडागळे यांना गोसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

मराठी साहित्याचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान या विषयास वाहिलेल्या या राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचे नियोजन पुण्यातील कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट,  मराठी भाषा संवर्धन समिती पुणे म.न.पा व चॅम्पियन्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले आहे.

 संमेलन प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे असे कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त देशभक्तकोशकार डॉ. चंद्रकांत शहासने हे कळवतात.
close