शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन) सामाजिक बातमी
शिर्डी येथे ११ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय भव्य वधु वर पालक परिचय मेळावा शिर्डीस प्रचंड मोठा प्रतिसाद व गर्दी बघावयास मिळाला ,उत्कृष्ट नियोजन व आयोजन यामुळे मेळावा सर्वांच्या पसंतीस आला, मेळाव्याचे खास वैशिष्ट्य होते ते १०१ रुपयांत नोंदणी व विना जाहिरातीचे वधु वर माहिती पुस्तक याचे प्रकाशन ह्या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा , श्री साईबाबा सेवा संस्थान शिर्डी व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स तर्फे विविध पुरस्कार वितरण सोहळा व वधू-वर मेळावा उत्साहात झाला. सामाजिक क्षेत्रात व कोरोना काळात उत्कृष्ट काम केलेल्या अन्य समाजातील मान्यवरांचाही गौरव यावेळी करण्यात आला.
शिर्डी येथील श्री साई पालखी निवारा येथील कै काकासाहेब वाघचौरे सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रमेश पन्हाळे, श्री भरत शेठ चवरे , श्री भरत साळुंखे, श्री सुधाकर बनसोडे, श्री सुरेश नागले, सौ पुष्पा चौधरी, सौ प्रीती चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रमेश जी पन्हाळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. श्री साईबाबा सेवा रत्न पुरस्कार २०२२ सौ विध्याताई रतन चौधरी राहता , डॉ.स्वप्नील माने राहुरी, श्री विठ्ठल रुख्मिनी मंदिर ट्रस्ट शिर्डी, श्री भरतशेठ चवरे मुंबई , श्री भरत साळुंखे बेलापूर, श्री साई पालखी निवारा निघोज ट्रस्ट शिर्डी यांना देण्यात आला. तर श्री संताजी महाराज जगनाडे समाज रत्न पुरस्कार २०२२ हा संगमनेर येथील डॉ अमोल वालझाडे यांना वैद्यकीय सेवा पुरस्कार तर श्री जनार्धन वालझाडे, शिपलापूर संगमनेर, दाढ तेली समाज राहता तालुका, तिळवण तेली समाज ट्रस्ट अहमदनगर, श्री जगन्नाथ लुटे शिर्डी यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री अॅड.विक्रांत वाघचौरे यांनी केले तर श्री पुष्पा चौधरी, श्री प्रकाश सैंदर,श्री भरत चवरे,श्री भरत साळुंखे, श्री बद्रीनाथ लोखंडे मेळावा समिती अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले.सौ रंजना शिंदे जिल्हाध्यक्ष महिला आघाडी , सौ तारकेश्वरी वालझाडे, सौ रीना वालझाडे, सौ वैशाली देशमाने, सौ पुष्पा चौधरी, सौ प्रीती चौधरी, यांचा धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून सत्कार करण्यात आला. श्री राकेश रायसोनी यांनी सुमधुर आवाजात सुत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रमेश पन्हाळे यांनी अध्यक्षीय भाषण केले तर आभार श्री संजय बागुल यांनी मानले.
यावेळी ट्रस्टचे सचिव श्री सचिन लोखंडे, श्री अमित महाले, श्री गणेश वाघचौरे,श्री यशवंतराव वाघचौरे, श्री अनिल बनसोडे, श्री नामदेव वाघचौरे,श्री विक्रम लुटे, श्री रतन चौधरी, श्री दीपक चौधरी, श्री मुकुंद बनसोडे, श्री प्रसाद शिंदे, श्री सागर काळे , श्री नीलेश दुर्गुडे, श्री निलेश काळे, सौ आशा राऊत, सौ हर्षदा वाघचौरे, सौ रोहिणी लोखंडे,सौ अनिता लुटे, श्री शिवाजी लुटे ,श्री राकेश भोकरे,सौ रंजना बागुल, सौ गायत्री चौधरी, श्री दिलीप राऊत, सौ सीमा मगर, सौ नयन पन्हाळे आदी समाज बांधव व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

