shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वाढदिवसाचे औचित्य साधून अतुलराजे इंगळे यांनी केली उद्धव स्वामीच्या संजिवन समाधी बांधकामासाठी मदत..!!

                            

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी  :-                                  
केज येथील जागृत देवस्थान उद्धव स्वामी संजीवन समाधी आहे. केज पंचक्रोशीतील भागात  उद्धव स्वामी यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या जागृत देवस्थानचे बांधकाम केज शहरातील काही होतकरु युवकांनी हाती घेतले आहे.            


काल सोमवारी केजचे युवा नेते उद्योजक अतुल इंगळे यांचा वाढदिवस होता. त्यांनी इतर खर्च टाळून उद्धव स्वामी यांच्या संजिवन समाधी बांधकामासाठी सिमेंटचा खर्च उचलून एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे*.                  
उद्धव स्वामी हे समर्थ रामदास स्वामी यांचे शिष्य होते. केज शहरातील प्रसिद्ध  राम मंदिर व हनुमान मंदिराच्या बांधकामाची जबाबदारी त्याकाळी समर्थ रामदास स्वामी यांनी त्यांच्या वर सोपवली होती.                         

उद्धव स्वामी संजिवन समाधी असून अंबेजोगाई रोड, नेहरकर वस्ती येथे आहे. केज शहरातील दात्यानी मोठ्या प्रमाणात या संजिवन समाधी बांधकामासाठी मदत करून या समाधीला गतवैभव प्राप्त करून द्यावे असे आवाहन उद्धव स्वामी संजिवन समाधी बांधकाम समितीने केले आहे*.
close