दत्तवाडी शाळेचे जल्लोष वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

इंदापूर प्रतिनिधी: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तवाडी(काटी) शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. शाळेला ' स्वच्छ शाळा गुणवंत शाळा पुरस्कार ' मिळाल्याचे ,  तसेच शाळेमध्ये शैक्षणिक सहल, निपुण भारत ,परिसर भेट,आॕनलाईन शिक्षण , इंग्रजी अध्ययन समृद्धी ,इंग्रजी वाचन आदि उपक्रम राबवित असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक ताहेर शेख यांनी प्रास्तविकात सांगितले.
कार्यक्रमात ' वार्षिक स्नेहसंमेलन हा स्तुत्य उपक्रम असल्याचे ' आणि एकच शिक्षक असून देखील कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याचे गौरोद्गार विलासबापू वाघमोडे यांनी काढले.
कार्यक्रमाचे खास आकर्षण असलेले ' माँ तुझे सलाम ' हे गीत अतिशय गाजले. याचबरोबर गवळण, फ्युजन साँग, शेतकरी गीत, कोळीगीत, पारंपरिक गीत, देशभक्तीपर गीत,कोरोना थिम गीत,लावणी, बालगीत, रिमिक्स साँग आदि गीते सादर करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळा परिसरातील पालकांनी खूप खूप प्रयत्न केले.
या कार्यक्रमास सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त दिनकर मोहिते,सरपंच तृप्तीताई हेमंत वाघमोडे,उपसरपंच सचिन माने,सोमनाथ मोहिते, विलास बोराटे,पोलीस पाटील पोमन भोसले,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  ज्ञानदेव सोलनकर, केंद्रप्रमुख संभाजी आजबे,शिक्षक सोसायटीचे उपसभापती सतिश गावडे, छायाताई पडसळकर,रेखाताई मरगळ,सुनिताताई बोराटे, शिवाजी यादव ,डाॕक्टर मरगळ,बकसभाई शेख,संतोष गदादे, शशिकांत शेंडे, संतोष तरंगे,विठ्ठ्ल मरगळ,संजय भोसले, गणेश बोराटे,मुख्तार मुलाणी,नितीन वाघमोडे, बबलू पठाण,सिताराम वडापुरे, शंकर बोराटे,तुकाराम भोसले,दिपक बोराटे,सचिन बोराटे,बबन यादव,महेश मासाळ, नवनाथ वडापुरे, संतोष भोसले, मनोहर आवताडे, स्वप्निल खिंडकर, राहूल ठोंबरे, आगतराव बोराटे, हरिश्चंद्र बोराटे ,अक्षय बोराटे, अजिनाथ सोलनकर, संतोष मोरे, शंकर शिंदे ,इस्माईल मुलाणी, शामराव वाघमोडे,अंगणवाडी सेविका उज्ज्वला भोसले,छाया मासाळ, आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन संतोष गदादे आणि ताहेर शेख यांनी केले. आभार प्रियंका शिंदनकर यांनी मानले.