shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जैन गुरुकुल येथे स्व. अ.भा. सोनटक्के स्पर्धेला उदंड प्रतिसाद


प्रतिनिधी : आसावरी वायकर 

सोलापूर : २५ /    स्व.अ.भा. सोनटक्के प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या हस्ताक्षर, पाठांतर व वक्तृत्व स्पर्धा दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात पार पडल्या. 

प्रारंभी स्व.आ.भा. सोनटक्के यांच्या प्रतिमेस प्रतिष्ठानचेअध्यक्ष अशोक दोशी व कोषाध्यक्ष अरुणकुमार धुमाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी  सचिव तथा प्राचार्य आशितोष शहा, विश्वस्त राजू देशमाने, उपप्राचार्य शैलेश पांगळ, पर्यवेक्षक राजकुमार काळे, नूतन विद्यालय आष्टीचे मुख्याध्यापक अजित हेरले, प्राथमिकच्या प्र.मुख्याध्यापिका पुष्पा झुंजुर्डे, बालक मंदिर विभागप्रमुख विभावरी रणदिवे इ.ची उपस्थिती होती.

 प्रशालेचे माजी पर्यवेक्षक अरुणकुमार धुमाळ यांनी सोनटक्के गुरुजींच्या कार्याचा आढावा घेतला. तद्नंतर बालक मंदिर ते खुला गट अशा वेगवेगळया ९ गटातील फॅन्सी ड्रेस, रंगभरण, हस्ताक्षर, पाठांतर व वक्तृत्व अशा वेगवेगळया गटात स्पर्धा पार पडल्या. शहरातील ८५ शाळेतील १९९३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी बालक, प्राथमिक, प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार-यांनी परिश्रम घेतले.
close