बावडा येथे १९७५-७६ च्या दहावी बॅचचे विद्यार्थी आले एकत्र !
बॅचमधील अडचणीतील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी फंड निर्मिती करण्याचा निर्णय घेताच फंडासाठी लगेच दिली अनेकांनी रोख आर्थिक मदत .
इंदापूर प्रतिनिधी :
बावडा येथे श्री शिवाजी माध्यमिक विद्यालयातील सन १९७५-७६ च्या दहावी बॅचचे विद्यार्थी हे पुन्हा वर्गामध्ये रविवारी (दि.२२) एकत्र आले. तब्बल ४७ वर्षांनी एकमेकांना भेटत असल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
एक दिवसभर हे विद्यार्थी त्या कालच्या आपल्या शिक्षकांबरोबर एकत्र रमले. या स्नेहसंमेलन प्रसंगी बॅचमधील अडचणीतील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी फंड निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. अन लगेच अनेकांनी रोख आर्थिक मदत फंडासाठी दिली. प्रास्ताविक अंकुश शिंदे व उल्हास शहा यांनी केले. यावेळी माजी प्राचार्य पी. एन. गोरे व के. एस. खाडे, भीमराव जाधव, हुसेन खान या माजी शिक्षकांनी मार्गदर्शन केले. यावेळी श्री शिवाजी विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डी. आर. घोगरे, प्रभाकर तळेकर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी यशस्वीतेसाठी अंकुश शिंदे, जयवंत पाटील, शिवाजीराव कोरटकर, सुभाष नायकुडे, मधुकर कळसाईत, अर्जुन निकम, विद्या केदार टकले यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अमर निलाखे तर आभार दिलीप पाटील यांनी मानले. या एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये १४ मुली व ५१ मुले असे ६५ विद्यार्थी एकत्र आले होते.

