शेतकरी संघर्ष समितीचा विद्युत कर्मचारी व अधिकार्यानी पुकारलेल्या संपास पाठींबा  

अध्यक्ष प्रा.पंडितराव पाटील यांनी दिली माहिती.
इंदापूर प्रतिनिधी:नवीन धोरणाच्या नावाखाली मागील दाराने  विद्युत मंडळाचे खाजगीकरण करण्याचा शासकीय डाव उधळून लावण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीचा विद्युत कर्मचारी व अधिकार्यानी पुकारलेल्या संपास पाठींबा असल्याचे अध्यक्ष प्रा.पंडितराव पाटील यांनी जाहिर केले आहे. 
याबाबत अधिक माहिती देतांना पाटील म्हणाले,एकीकडे सध्या शासकीय अनुदानावर वापरात असलेली विजदेखील शेतीसाठी परवडत नाही. शेती व्यवसायाची एकूण अवस्था,शेतीच्या दुरावस्थेमुळे त्रस्त शेतकर्याच्या वाढत्या आत्महत्या, न परवडणारी  शेती लक्षात घेऊन शेतकरी शेतीसाठी मोफत विजेची मागणी करीत आहे. सदर रास्त व न्याय्य मागणीचा विचार बाजूला ठेवून शासन अदानी ,अंबानीच्या घशात महावितरणला घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. शासनाने लोकमताचा विचार न करता एकांगी निर्णय  घेतल्यास शासनाला त्याचे गंभिर परिणाम भोगावे लागतील असा इशारा अध्यक्ष पाटील यांनी दिला.