shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विज कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र बंदाला केज तालुक्यात उत्स्फुर्त प्रतिसाद !!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी  :-                               
महावितरण व महापारेषण सह तब्बल ३0 संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला केज तालुक्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे केज तालुक्यात सर्वञ लाईटचा खोळंबा उडला आहे. केज तालुक्यातील तब्बल पाच फिडर सध्या बंद पडल्यामुळे जनतेला प्रचंड प्रमाणात ञास सहन करावा लागतो आहे.
 
मस्साजोग सब स्टेशन, हनुमंत पिंपरी, देवगाव, राजेगाव व विडा सब स्टेशन पुर्णतः बंद असल्यामुळे जनतेचे अतोनात हाल होत असून जनावरांचे पाणी, माणसांना लागणारे पाणी, लहान सहान उद्योग धंदे यांचे लाईटच नसल्याने तारांबळ उडाली आहे. संप सर्व व्यापी असल्याने कोणताच कर्मचारी फोन पण उचलत नाही व उचलला तरी वरुनच लाईट बंद आहे हे उत्तर ऐकायला मिळत आहे. 


या संपामध्ये सर्व कर्मचारी संघटना सहभागी झाल्या आहेत. केज तालुक्यात शंभर टक्के कर्मचारी संपात सहभागी असुन त्यात त्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. तरी महाराष्ट्र शासनाने या प्रश्नी तात्काळ दखल घेऊन तोडगा काढून संप मिटवून टाकावा अशी मागणी जनतेतून व कर्मचारी संघटना कडून होत आहे.
close