shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अ.भा.ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश संघटक पदी गोपालराव सरनायक तर हिंगोली जिल्हाध्यक्ष पदी महेंद्र पुरी यांची निवड..!

हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)

हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची हिंगोली कार्यकारीणीची निवड दि.१ जानेवारी रविवार रोजी करण्यात आली.तसेच यावेळी गोपालराव सरनायक यांची अखिल भारतीय पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.



अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे माजी हिंगोली जिल्हाध्यक्ष विकास दळवी यांच्या अध्यक्षतेखाली व नुतन महाराष्ट्र प्रदेश संघटक गोपालराव सरनायक यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली.यावेळी प्रथम गतवर्षी हिंगोली जिल्हा कार्यकारिणी चा आढावा घेऊन हिंगोली जिल्हाध्यक्ष पद हे नविन सदस्यास देण्याचे सर्वानुमते ठरल्याने पत्रकार महेंद्र पुरी यांच्या नावावर एकमत झाले.

अध्यक्ष व पाहुण्यांच्या वतीने महेंद्र पुरी यांना जिल्हाध्यक्ष पदासाठी मान्यता देण्यात आली.तसेच यावेळी नुतन जिल्हाध्यक्ष महेंद्र पुरी यांच्या अध्यक्षतेखाली हिंगोली जिल्ह्याची कार्यकारीनी घोषीत करण्यात आली.हिंगोली जिल्हा सल्लागार पदी विकास दळवी,उपाध्यक्ष पदी गोंविद देशमुख,भिमराव बोखारे,विलास लासुरे,कार्याध्यक्ष पदीथ गजानन देशमुख,सह कार्याध्यक्ष पदी गोवर्धन खंदारे,सचिव पदी रामा सारंग,सह सचिव पदी सय्यद अहमद,कोषाध्यक्ष पदी लक्ष्मण मालकर,सह कोषाध्यक्ष पदी गोपाल सातपुते,जिल्हा प्रसिध्दीप्रमुख शिवशंकर निरगुडे,सह-सल्लागार संदीप घुगे,जिल्हा संघटक विश्वनाथ देशमुख,सह संघटक सुरेश किर्तने यांची हिंगोली जिल्हा कार्यकारीणीवर निवड करण्यात आली.

तर हिंगोली तालुकाध्यक्ष पदी रमेश आढळकर,सेनगाव तालुकाध्यक्ष पदी गजानन मगर,औंढा(ना) तालुकाध्यक्ष पदी अहमद पठाण,वसमत तालुकाध्यक्ष पदी प्रल्हाद चव्हाण,कळमनुरी तालुकाध्यक्ष पदी गंगाधर आडकीणे यांची निवड करण्यात आली.तसेच हिंगोली जिल्हा महिला कार्यकारीणी निवडण्यात आली असुन जिल्हाध्यक्ष पदी मनिषा थोरात,सचिव पदी पल्लवी अटल,कोषाध्यक्ष पदी गंगासागर पंडीत यांची निवड करण्यात आली.वरील सर्व जिल्हा कार्यकारीणीचा सत्कार महाराष्ट्र प्रदेश संघटक गोपालराव सरनायक यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी हिंगोली जिल्हयातील पत्रकार गोपाल हलगे,गजानन पवार,भागवत वाघ,प्रदीप वाघ,गजानन मगर,निळकंठ भादलकर,विश्वनाथ देशमुख,बालाजी दिवाने,शेख खाजा,श्रीकांत शिंदे,शिला ढगे,आदीनाथ दशरथे आदीसह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

close