शिर्डी ( संजय महाजन ):-
राहाता येथील डॉ. किरण गोरे सर यांचे वडील रामकृष्ण (नाना) गोरे यांची 75 वा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील रहिवासी असणारे व शेवगाव पंचायत समितीचे सेवानिवृत अधिकारी रामकृष्ण (नाना) गोरे यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त रामायणाचार्य ह. भ. प. वैभव महाराज माळवदे यांचा प्रवचनाचा कार्यक्रम व त्यानंतर ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे प्रमुख लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या उपस्थितीत अमृत महोत्सव सोहळा आनंदात पार पाडण्यात आला.
खरोखर हा अतिशय भाग्याचा व अविस्मरणीय क्षण आहे प्रतिकूल परिस्थिती शिक्षणाच्या अथवा प्रगतीच्या आड येऊ शकत नाही हे नानांनी आपल्या कर्तुत्वाने सिद्ध करून दाखवले आहे. एक मुलगा गोल्ड मेडलिस्ट प्रख्यात डॉक्टर तर दुसरा विदेशात उद्योजक बनवून आपणा सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. प्रत्येकाच्या सुख दुःखात तन-मन-धनाने जाऊन मदत करण्याची त्यांची वृत्ती आपणास नवी ऊर्जा देणारी आहे. निस्वार्थी निरपेक्ष भावनेतून सामाजिक बांधिलकी जोपासणार नानांचे व्यक्तिमत्व प्रत्येकासाठी प्रेरणादायी व आदर्शवत आहे सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, अध्यात्मिक, कृषी या क्षेत्रात कार्यरत राहून वयाच्या ७५ वी मध्येही समाजसेवेचे व लोक हिताचं कार्य करणारे नाना विचार व आचाराऺचे, संस्काराचे व संस्कृतीचे एक चालते बोलते विद्यापीठच आहे.
या कार्यक्रमासाठी नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील, श्रीरामपूर मतदारसंघाचे आमदार साहित्यिक लहुजी कानडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार पांडुरंग अभंग, सेवानिवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक डी.डी. गवारे साहेब, लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक काकासाहेब नरवडे, प्रसिद्ध उद्योजक अंकुशराव कानडे यांच्या प्रमुख उपस्थिती होते.
याप्रसंगी कार्यक्रमात सर्व नातेवाईक व विशेषत नगरचे तरुण उद्योजक संतोषी कांबळे तसेच नानांचा रिटायर मित्र मंडळी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी डॉ.किरण गोरे, डॉ.अश्विनी गोरे व सचिन गोरे यांच्यासह परिवाराने परिश्रम घेतले.

