शाळेच्या आगामी प्रगतीसाठी शरयू फाउंडेशन च्या माध्यमातून भरीव सहकार्य करण्यात येईल- शर्मिलाताई पवार
तावशी येथील मंडलिकवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना उबदार ब्लॅंकेटचे मोफत वाटप
फोटो: इंदापूर तालुक्यातील मंडलिक वस्ती येथील प्राथमिक शाळकरी विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट चे वाटप करताना शरयु फाउंडेशनच्या प्रमुख शर्मिलाताई पवार व मान्यवर.
इंदापूर(प्रतिनिधी):इंदापूर तालुक्यातील पुणे जिल्हा परिषदेची मंडलिक वस्ती येथील प्राथमिक शाळेत,शिक्षक पालक व विद्यार्थी यांच्या आदर्श एकोप्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण निर्माण झाले असून पुणे जिल्ह्यात ही प्राथमिक शाळा आदर्श ठरली आहे.या शाळेच्या आगामी प्रगतीसाठी शरयू फाउंडेशन च्या माध्यमातून भरीव सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही, शरयु फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिलाताई पवार यांनी दिली.
समाजभूषण स्व अनंतराव पवार (तात्यासाहेब)यांच्या स्मृती दिनानिमित्त शुक्रवार दि १३ जानेवारी शरयु फौंडेशनच्या वतीने आदर्श जिल्हा परिषद शाळा मंडलिकवस्ती तावशी(ता इंदापूर)येथे शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिलाताई पवार यांच्या हस्ते शाळकरी विद्यार्थ्यांना उबदार ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नीलकंठ मोहिते,अनिल काटे,श्रीनिवास कदम,अभय काटे,सुमित यादव,वसंतराव जगताप,हसन तांबोळी,
यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.येथील शेकडो विद्यार्थ्यांसोबत गप्पागोष्टी,परिपाठातील धडे,यावर शर्मिलाताई पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद
साधला.विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कला साहित्य प्रदर्शन व निर्मल व स्वच्छ सुंदरग्राम प्रतिकृती या प्रदर्शनास भेट दिली.मुलांनी तयार केलेले साहित्य पाहून मान्यवर भारावून गेले.
पुढे बोलताना शर्मिलाताई पवार म्हणाल्या की,राज्यभर शिक्षणाचे जाळे अनेक संस्थेच्या माध्यमातून पसरले आहे.मात्र जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अध्ययनाचे धडे,शहरी भागाच्या बरोबरीने मंडलिक वस्ती सारख्या शाळेचे आहेत.त्यामुळे येतील विद्यार्थी सर्व क्षेत्रात चमकत आहेत याचा अभिमान वाटतो. प्राथमिक शाळा असताना देखील,येथिल पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांचे पुढचे भविष्य घडवण्याच्यादृष्टिकोनातून,शाळेला मदत करून अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत.यामुळेच शिक्षकांना अध्ययन पद्धती अद्यावत राबवता येते आहे.येथील उर्वरित असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी शरयु फाउंडेशन कटिबद्ध राहणार आहे अशी ही माहिती शर्मिलाताई पवार यांनी दिली.
शाळेत विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सुरू असलेल्या यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव,इंग्रजांच्या अध्ययन समृद्धी उपक्रम, शनिवारी दप्तर मुक्त शाळा,इंग्लिश स्पीकिंग,अबॅकस शिक्षण अशा प्रकारच्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक शर्मिलाताई पवार यांनी केले.
कुरवली केंद्राचे केंद्रप्रमुख मारुती सुपुते, साहेब शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वर्षा मोरे,शिक्षणप्रेमी अंकुश मोरे,उपाध्यक्ष रणजीत सपकळ,निलेश राऊत,परवीन महात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.माधवी प्रवीण शेटे,
शिक्षकवृंद अश्विनी दिनेश साळुंखे,चंद्रकांत सोपान बनकर,श्रीमती उज्वला जगन्नाथ भंडलकर,ऋतुजा राहुल सपकळ,सुप्रिया अमरसिंह सपकळ उपस्थित होते.

