मराठी शाळेत मुलांना जे शिक्षण मिळते त्याला तोड नाही आणि म्हणूनच मराठी शाळेंना शासनाने जास्तीत जास्त मदत करून त्या उत्कृष्ट कशा चालतील याचे धोरण आखावे - अनिताताई खरात
खोरोची येथील साखरेवस्तीच्या शाळेत भरला आठवडे बाजार.
इंदापूर प्रतिनिधी: मराठी शाळेत मुलांना जे शिक्षण मिळते त्याला तोड नाही आणि म्हणूनच मराठी शाळेंना शासनाने जास्तीत जास्त मदत करून त्या उत्कृष्ट कशा चालतील याचे धोरण आखावे असे प्रतिपादन
जि. प. शाळा साखरेवस्ती खोरोची केंद्र रेडनी ता. इंदापूर या ठिकाणी बाल आनंद मेळावा व आठवडे बाजार
आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या समारंभ प्रसंगी तेजपृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिताताई खरात यांनी केले.
यावेळी मेळावाचे उद्घाटन तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनिताताई खरात यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन अनिताताईंच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास साखरे वस्ती व परिसरातील नागरिक महिला पुरुष मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते
बाजारासाठी सर्व प्रकारचा भाजीपाला ,खाऊ गल्ली, यांची दुकाने लावली होती.
बाजारामध्ये मुले आपला माल विकताना व्यवहारातील भाषा वापरत होते, विक्रेता व ग्राहक यांच्यामध्ये सुसंवाद होतहोता ,पालक आपल्या पाल्याकडून शेतीमाल विकत घेताना त्यांच्या चेहऱ्यावर अविस्मरणीय आनंद अनुभवल्यास मिळाला. या बाजारात मुले व्यवहारातील सुट्टे व बंदे पैसे याचा उत्तम वापर करताना दिसून आली. या आठवडी बाजाराच्या उपक्रमाला ग्रामस्थांनी प्रतिसाद तर दिलाच पण कौतुक ही केले. या बाजारात ४९४४ रुपये इतकी झाली.
या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी अनिताताई म्हणाल्या की, साखरे वस्ती शाळेमध्ये आजच्या आठवड्या बाजाराचे नियोजन अतिशय सुंदर केले असून शाळेत जाधव गुरुजी व वच्चे गुरुजी यांच्या माध्यमातून नेहमीच उत्तम पद्धतीने शालेय उपक्रम राबवले जात असतात, तसेच शाळेचा पट हळूहळू वाढत आहे आणि खरंच मराठी शाळेत मुलांना जे शिक्षण मिळते त्याला तोड नाही आणि म्हणूनच मराठी शाळेंना शासनाने जास्तीत जास्त मदत करून त्या उत्कृष्ट कशा चालतील याचे धोरण आखावे. आम्ही तेजप्रुथ्वी ग्रुपच्या माध्यमातून मराठी शाळेच्या भल्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतो.
जाधव गुरुजी,वच्चे गुरुजी तसेच अंगणवाडी सेविका कुंभार मॅडम व मुलानी मॅडम यांनी या आनंदी मेळाव्याचे अतिशय सुंदर नियोजन केल्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानते.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश साखरे, इंदापूरचे विशाल म्हेत्रे , जाधववस्ती शाळेची मुले आणि मनीषा आरडक मॅडम तसेच ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

