शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
बुधवार दिनांक २९ फेब्रुवारी २०२३
पो. नि. बहिरट यांच्यासह इतर पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी- डाॅ. मकासरे..!!
राहुरी : पोलिस निरीक्षक श्रीहरी रामचंद्र बहिरटसह इतर कर्मचाऱ्यांच्या गैरअर्जदाराची चौकशी करुन त्यांच्या विरोधात कारवाई करावी. अशी मागणी नाशिक प्राधिकरण विभागाचे विभाग स्तरीय पोलीस तक्रार विभागाकडे डॉ. विजय आण्णासाहेब मकासरे यांनी केली आहे.
डॉ. मकासरे निवेदनात म्हटले आहे की, गुन्हे शाखा युनिट ३, पुणे शहराचे पोलीस निरीक्षक श्रीहरी रामचंद्र बहिरट, पोलीस कॉन्स्टेबल, आस्थापना विभागाचे रिचर्ड रघुवीर गायकवाड, श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे साईनाथ अशोक राशिनकर, पोलीस कॉन्स्टेबल किशोर सुभाष जाधव यांनी माझ्या विरुध्द श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनमध्ये गु. र. नं. १६१/२०१९ भा. दं. वि. ४२०, ४९६, ३४७, ५०६ सह ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. सदरचा गुन्हा हा माझ्या विरुध्द राजकीय षडयंत्रामुळे दाखल झालेला होता. सदरच्या दाखल असलेल्या श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यातुन माझे नाव वगळण्यासाठी गैरअर्जदार साईनाथ अशोक राशिनकर यांनी माझ्याकडे लाचेची मागणी केली होती.
तशी तक्रार मी लाच लुचपत विभाग अहमदनगर यांच्याकडे केली होती. परंतु सदरच्या लाचलुचपतचा सापळा त्यावेळी अयशस्वी झाला. सदरचा लाच लुचपतचा सापळा लावल्याचे लक्षात आल्यानंतर तत्कालीन गैरअर्जदार पोलीस निरीक्षक श्रीहरी रामचंद्र बहिरट यांनी गैरअर्जदार रिचर्ड रघुवीर गायकवाड यास जाणून बुजुन माझ्या फॉर्म्युनर गाडीमध्ये जबरदस्तीने बसण्यास सांगितले.
त्यावेळी गैरअर्जदार गायकवाड यांना गाडीतुन 'उतरा अशी विनंती केली. पण ते त्यावेळी गाडीतून उतरले नाही व त्यांनी गैरअर्जदार बहिरट यांना फोन करुन सांगितले की, ते गाडीतून उतरा असे सांगत आहे. तेंव्हा गैरअर्जदार बहिरट यांनी गैरअर्जदार गायकवाड यांना सांगितले की, गाडीतुन खाली उतरु नका.
तेव्हा मी माझी गाडी लाच लुचपतचे अधिकारी यांच्या सांगन्यावरुन बेलापुरच्या दिशेने घेवुन निघालो व त्यावेळी मुददामहुन ठरवुन गैरअर्जदार बहिरट गैरअर्जदार किशोर सुभाष जाधव यांनी पाठलाग करत माझ्या गाडीला गैरअर्जदार बहिरट व जाधव यांनी त्यांची खाजगी गाडी आडवी लावुन मला शिवीगाळ करुन मारहाण करण्याचा प्रयत्न केला.
लाच लुचपतचे अधिकारी व कर्मचारी यांनी मध्यस्थी करुन त्यांच्या तावडीतुन सोडविले. त्यामुळे त्यांच्या विरुध्द लाच लुचपतचा सापळा लावल्याचा राग व व्देष मनामध्ये ठेवुन माझ्याविरुध्द जाणून बुजुन कट कारस्थान केले आहे.
पोलीस निरीक्षक बहिरटसह इतर कर्मचाऱ्यांच्या या गैरअर्जदाराची चौकशी करुन त्यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी मकासरेंनी केली.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

