shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरी - वीजबिलाच्या वसुलीस गेलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्याला लाकडी दांड्याने बेदम मारहाण..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
बुधवार दिनांक २९ फेब्रुवारी २०२३

राहुरी - वीजबिलाच्या वसुलीस गेलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्याला लाकडी दांड्याने बेदम मारहाण..!!

राहुरी  : राहुरी शहरांमध्ये वीजबील वसुलीसाठी गेलेले अधिकारी व कर्मचाऱ्यास शिवीगाळ दमदाटी करून लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे.व तसेच स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना २६ फेब्रुवारीला दुपारी शहरातील कानिफनाथ चौकात घडली.
   राहुरीच्या महावितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंता योगेश तानाजी गावले,प्रदीप भगवान अडसुरे तसेच कर्मचारी किरण नंदकुमार पाचारणे हे वीजबील वसुली पथक राहुरी शहरातील कानिफनाथ चौक येथे राजेंद्र भाउसाहेब देसाई यांच्या घरी गेले होते.राजेंद्र देसाई यांना ७ हजार ९४० रुपये थकबाकीचे बील भरणेबाबत चार वेळेस नोटीस पाठवण्यात आली होती.वीज कनेक्शन कट करत असताना राजेंद्र देसाई याने योगेश गावले व किरण पाचारणे यांना शिवीगाळ रॉकेलचा ड्रम घेवून स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राजेंद्र देसाई यांचा मुलगा सिध्दार्थ राजेंद्रगावले व किरण पाचारणे यांना शिवीगाळ रॉकेलचा ड्रम घेवून स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी राजेंद्र देसाई यांचा मुलगा सिध्दार्थ राजेंद्र देसाई याने लाकडी दांडा घेऊन योगेश गावले व किरण पाचारणे यांना मारहाण केली.दोन महिन्यांपूर्वी राजेंद्र देसाई याने वीज बिल भरण्याच्या कारणावरून योगेश गावले यांच्या कार्यालयात जावून वाद केला होता.सहाय्यक अभियंता योगेश गावले यांच्या फिर्यादीवरून राजेंद्र भाउसाहेब देसाई व त्याचा मुलगा सिध्दार्थ राजेंद्र देसाई दोघे रा.कानिफनाथ चौक,राहुरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी आरोपी राजेंद्र देसाई याला ताब्यात घेतले असून सिध्दार्थ देसाई हा पसार झाला.
 अधिक तपास राहुरी पोलीस हे करत आहेत.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600



close