शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
बुधवार दिनांक २९ फेब्रुवारी २०२३
नवीन पुलामुळे या भागातील दळण वळणाचा प्रश्न कायमचा मिटणार..!!
करपरा पुलाची आमदार तनपुरे यांच्याकडून पाहणी..!!
राहुरी : तालूक्यातील केंदळ बु. (करपरा) येथील राहुरी खु. ते पिंप्री वळण या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधुन रस्त्यावर अनेक वर्षापासुन प्रलंबीत असलेला केंदळ बु - शिलेगांव करपरा पुलाची पहाणी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली.
2018 साली झालेला राहुरी खु., देसवंडी, कोंढवड, शिलेगांव, केंदळ बु., केंदळ खु., पिंप्री वळण असा रस्ता आहे. परंतु या रस्त्यावर संबधीत कामाच्या तरतुदीत पुलांचा समावेश नव्हता. त्याममुळे या रत्यावर रस्ता होवुनही दळण वळणचा प्रश्न गंभीर झालेला होता.
आमदार तनपुरे 2019 मध्ये विधान सभेत जाताच मिळालेल्या मंत्री पदाच्या माध्यमातुन त्यांनी जानेवारी 2022 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे विशेष प्रयत्नातुन केंदळ बु. करपरा पुलासाठी 3 कोटी 23 लाखांचा निधी मंजुर केला.
या पुलाचे काम सध्या अंतिम टप्यात असुन या कामाबाबत पहाणी दरम्यान आमदार तनपुरे यांनी समाधान व्यक्त केले.
या पुलाच्या कामामुळे कोंढवड, शिलेगांव, ब्राम्हणी, केंदळ बु, केंदळ खु. नागरीकांचा दळण वळणचा प्रश्न सुटनार आहे. केंदळ बु. येथील मुळा नदीच्या पुलावर अतिवृष्टीत जास्त पाणी आल्यामुळे हा पुल पाण्याखाली जात होता.
आता करपरा येथील नवीन पुलामुळे या भागातील दळण वळणाचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. यावेळी केंदळ बुद्रुक येथील ग्रामस्थांनी आमदार तनपुरे यांचे आभार व्यक्त केले.
आमदार तनपुरे यांचे समवेत पहाणी करते वेळी खरेदी विक्री संघाचे संचालक विष्णु तारडे, केंदळ तंटामुक्ती अध्यक्ष रावसाहेब तारडे, पोलीस पाटील प्रल्हाद तारडे, नामदेव तारडे, कानिफनाथ तारडे,
प्रल्हाद तारडे, मंगेश बोरकर, प्रमोद तारडे, मधुकर तारडे, आण्णासाहेब देवरे, गिताराम पटारे, कैलास मांगुर्डे, भाऊसाहेब तारडे, मधुकर तारडे, अमोल तारडे, कणगरचे मा. सरपंच सुयोग नालकर तसेच कनिष्ठ अभियंता रविंद्र संसारे, राईटस कन्स्ट्रक्शनचे सागर कोतकर आदी उपस्थीत होते.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

